‘निनाई’चे २० कोटी विरोधकांनी खाल्ले : मानसिंगराव नाईक
कोल्हापूर : निनाई साखर कारखान्याचा दालमिया कधी झाला, हे सभासदांना कळलेच नाही. निनाई साखर कारखान्याच्या सभासदांचे २० कोटी खाण्याचे काम विरोधकांनी केले आहे, त्यांना मतदार थारा देणार नाहीत, असे प्रतिपादन मानसिंगराव नाईक यांनी केले.
नाईक यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, देवराज पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राजारामबापू साखरचे अध्यक्ष प्रतीक पाटील, अमरसिंह नाईक, रणधीर नाईक, विराज नाईक, सम्राटसिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नाईक म्हणाले की, आमच्या संस्थाही अडचणीत होत्या, मात्र त्या संस्था आज राज्यात आदर्श ठरत आहेत. मात्र विरोधकांचा निनाईदेवी साखर कारखाना दालमिया कधी झाला हे सभासद शेतकऱ्यांना सुद्धा कळाले नाही. आम्ही संपूर्ण मदारसंघाचा शेतकरी, सामान्य नागरिकांना विकासाचा केंद्रबिंदू मानून विकासात्मक बदल घडवून आणत आहोत. पवार यांना भेटतो म्हणून टीका करीत आहेत. विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटतो म्हणून माझे विरोधक टीका करत असतात, मी अजितदादांकडून निधी आणतो याचे त्यांना दु:ख वाटते. विरोधकांनी योग्य टीका करावी.