शिवपार्वती कारखान्यावर सीबीआयचे छापे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बीड – जिल्ह्यातील मुंगी (धारूर) येथील शिवपार्वती या साखर कारखान्यावर सीबीआयने बुधवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस छापे टाकले. त्यामागे पंजाब नॅशनल बँक बुडित प्रकरण असल्याचे समोर आले आहे. या बँकतील घोटाळ्यात दाखल गुन्ह्याचा तपास सीबीआय करत आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचे धागेदोरे बीड जिल्ह्यातील मुंगी तालुका धारूर येथे असलेल्या शिवपार्वती कारखान्याला कोट्यवधी रुपयांची कर्ज दिले होते. सदर कारखान्याकडे तारणासाठी पुरेशी प्राॅपर्टी नव्हती. तरी हे कर्ज देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
शिवपार्वती साखर कारखान्याची उभारणी पांडुरंग सोळुंके यांच्या पुढाकारातून करण्यात आली. यात इतरही काही भागीदार आणि संचालक होते. या कारखान्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने कर्ज दिले; मात्र त्यानंतरच्या काळात कारखाना सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे पंजाब नॅशनल बँक आणि कारखान्याच्या संचालकांनी देखील हा कारखाना विकण्याचा प्रयत्न केले होते.

मराठवाड्यातील अनेक राजकीय पक्षांच्या लोकांनी यात कारखाना घेण्यास तयार होते. मात्र वेगवेगळ्या न्यायालय प्रक्रियेमुळे ही विक्री प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यातच काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने या कारखान्याची लिलाव प्रक्रिया सुरू करण्याच्या आदेश दिले होते. याची पुढील सुनावणी 3 एप्रिल रोजी होणार आहे. हे सारे होत असताना पंजाब नॅशनल बँकेने गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास सीबीआयकडे गेला आणि त्यातूनच छापेमारी सुरू झाल्याचे समोर येत आहे.

या कारवाईत सीबीआयसोबत ईडीचेही दहा ते पंधरा अधिकारी होते. त्यांनी गुरुवारी प्रत्यक्षात कारखान्यावर जाऊन तपासणी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात या दोन्ही केंद्रीय तपास एजन्सीजच्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »