‘उदगिरी शुगर’कडून १६५ कोटी एफआरपी जमा, १२ टक्के उतारा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

विटा : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात १६५ कोटींची संपूर्ण रक्कम एफआरपीपोटी जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल कदम यांनी दिली.

कारखान्याच्या २०२२-२३ च्या दहाव्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली. त्यानिमित्ताने डॉ. कदम यांनी हंगामाचा आढावा घेतला. .

एफआरपीची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात एकरकमी जमा करण्यात आली आहे. या हंगामामध्ये आमच्या कारखान्याने ५ लाख ५९ हजार १५३ टन ऊस गाळप केला आणि ६ लाख ३७ हजार ८३० क्विंटल साखर उत्पादित केली. साखर उतारा सरासरी १२.०३ टक्के मिळाला आहे, असे डॉ. कदम म्हणाले.

कारखान्यातील बी हेवी मोलॅसिस केंद्र सरकारच्या धोरणानुसार डिस्टिलरी प्रकल्पाकडे वळवून त्यातून इथेनॉल उत्पादन घेतले आहे. याचाही रिकव्हरीमध्ये समावेश आहे. एफआरपीच्या २ हजार ९५० प्रमाणे होणारी रक्कम १६४ कोटी ९५ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती चेअरमन डॉ. कदम यांनी दिली.
एफआरपीची सर्व रक्कम शेतकऱ्यांना एकरकमी देणारा उदगिरी शुगर सांगली जिल्ह्यातील पहिला कारखाना ठरला आहे.


पुढील हंगामासाठी ऊस नोंदणीचे आवाहन

गळीत हंगाम २०२३ – २४ साठी उसाची नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या उसाची नोंदणी कारखान्याकडे करावी, असे आवाहन डॉ. राहुल कदम यांनी केले आहे. उसाची लागण, वाण आदी घटक विचारात घेऊन पुढील ऊसतोडणी कार्यक्रम राबवण्याचे कारखाना व्यवस्थापनाचे धोरण आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »