डॉ. शिवराम कारंथ
आज सोमवार, डिसेंबर ९, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण १८, शके १९४६
आजचे पंचांग.
सूर्योदय : ०७:०१ सूर्यास्त : १८:०१
चंद्रोदय : १३:१५ चंद्रास्त : ०१:३८, डिसेंबर १०
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष :शुक्ल पक्ष
तिथि : अष्टमी – ०८:०२ पर्यंत
क्षय तिथि : नवमी – ०६:०१, डिसेंबर १० पर्यंत
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा – १४:५६ पर्यंत
योग : सिद्धि – ०१:०६, डिसेंबर १० पर्यंत
करण : बव – ०८:०२ पर्यंत
द्वितीय करण : बालव – १९:०४ पर्यंत
क्षय करण : कौलव – ०६:०१, डिसेंबर १० पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : कुंभ – ०९:१४ पर्यंत
राहुकाल : ०८:२३ ते ०९:४६
गुलिक काल : १३:५४ ते १५:१६
यमगण्ड : ११:०८ ते १२:३१
अभिजितमुहूर्त : १२:०९ ते १२:५३
दुर्मुहूर्त : १२:५३ ते १३:३७
दुर्मुहूर्त : १५:०५ ते १५:४९
अमृत काल : ०७:१८ ते ०८:५०
वर्ज्य : २३:५८ ते ०१:२८, डिसेंबर १०
आज आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे.
डॉ. शिवराम कारंथ – सुप्रसिद्ध कन्नड लेखक, तत्त्वचिंतक, विचारवंत, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते, समाजसुधारक डॉ. शिवराम कारंथ हे एक अद्भुत व्यक्तिमत्त्व होते. ते भारतीय साहित्यविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. १० ऑक्टोबर १९०२ रोजी कर्नाटकमधील उडुपी जिल्ह्यतील कोट या गावी एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शेष कारंथ शिक्षक होते. कुंदापूर येथे शिवराम कारंथ यांचं प्राथमिक शिक्षण झालं. लहानपणापासूनच त्यांना निसर्गाचे मोठे आकर्षण होते.
मंगलोर येथे महाविद्यालयात इंटरच्या वर्गात शिकत असतानाच महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात ते सहभागी झाले आणि शिक्षण सोडून स्वातंत्र्यलढ्यात उतरले. स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने आपल्या भूप्रदेशात फिरत असताना, समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांवर असलेले दोष त्यांच्या लक्षात आले. ते दूर करून चांगला समाज निर्माण करावा, या हेतूने त्यांनी ‘वसंत’ नावाचं मासिक सुरू केलं आणि यासाठी लेखन करायचं म्हणून त्यांची लेखनाला सुरुवात झाली.
समाजसुधारणेचा एक भाग म्हणून याच काळात त्यांनी नाटके लिहायला आणि नाटके बसवायला सुरुवात केली. त्यासाठी लेखन केलं आणि इतर भाषांतील नाटकांचे अनुवादही केले.
शिवराम कारंथ यांच्या पत्नी लीला मराठीच्या जाणकार होत्या. त्यांच्या मदतीने त्यांनी ‘पण लक्षात कोण घेतो?’ या कादंबरीचा कन्नड अनुवाद केला. एका मित्राच्या मदतीने गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकाचा ‘नशा महिमे’ या नावाने अनुवाद केला. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना आस्था होती. शाळांचे ‘कोंडवाडा’ हे स्वरूप त्यांना मुळीच मान्य नव्हते. त्यांनी वर्तमान शिक्षण प्रणालीतील दोष लक्षात घेऊन स्वत: पाठ्यपुस्तके लिहिली. शब्दकोश, विश्वकोशाची निर्मिती केली. त्यांनी तयार केलेली शालेय पाठ्यपुस्तके आजही कर्नाटकात वापरली जातात.
भूगोलाचं पुस्तक तयार करण्यासाठी त्यांनी स्वत: सारा जिल्हा पायाखाली घातला. मुलांसाठी बालप्रपंच हा ज्ञानकोश, तसंच प्राणी प्रपंच, पक्षी प्रपंच कोश, विज्ञान कोश तयार केले. ‘दी व्हिस्परिंग अर्थ’ हा त्यांच्याच कादंबरीचा इंग्रजी अनुवाद. माणूस आणि माती यांच्यातील नाते अधोरेखित करणारी ही कादंबरी कर्नाटकातील एका शेतकऱ्याच्या तीन पिढ्यांची कहाणी सांगते. या कहाणीत कर्नाटकातील विशिष्ट काळच्या संस्कृतीची मांडणी कारंथ यांनी केली आहे. ‘चोमन दुडी’ या त्यांच्या कादंबरीचा मराठी अनुवाद ‘चोमा महार’ या नावाने श्यामलता काकडे यांनी केला आहे.
१९७७ साली त्यांना कन्नड कादंबरी ‘मूकज्जिय कनसुगलु’साठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही कादंबरी १९६१ ते १९७० या कालावधीत प्रकाशित भारतीय भाषेतील सृजनात्मक साहित्यात सर्वश्रेष्ठ म्हणून निवडण्यात आली. शिवराम कारंथ यांचे नऊ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.
• १९९७: कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, पद्मभूषण आणि साहित्य अकादमी अवॉर्ड विजेते के. शिवराम कारंथ यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर , १९०२)
“सैन्यानं एक चांगला सहकारी आणि देशानं एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांची आठवण सदैव आपल्या मनात तेवत ठेवूया, ” असे उद्गार चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते माओ झेदांग यांनी डॉक्टर कोटणीसांना आदरांजली वाहताना काढले होते.
चीनमधला कोणताही बडा नेता भारतात आला की तो एका कुटुंबाची हमखास भेट घेतो… मुंबईच्या कोटणीस कुटुंबाची.
दुसऱ्या महायुद्धावेळी चीन आणि जपान एकमेकांविरुद्ध लढले होते.
त्यावेळी एका भारतीय डॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांनी आपले प्राण धोक्यात घालून अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले होते.
जपान आणि चीनमधलं युद्ध पेटल्यानंतर चीनचे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी अनेकांना प्लेगची लागण झाली होती.
त्यांना वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशानं भारतीय वैद्यक मिशननं एक टीम चीनला पाठवली. त्या टीममध्ये डॉ. कोटनीस हे एक होते. ते आपलं काम अतिशय मन लावून करत असत.
त्यांनी केलेल्या सेवेमुळं अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचले. युद्धभूमीवर प्लेगची भीषण लागण झाली होती. सैनिकांवर उपचार करण्यास इतर डॉक्टर लोक घाबरत असत पण कोटणीस कधी घाबरले नाहीत.
त्यांनी किमान 800 जणांवर उपचार केले असावेत असं म्हणतात. तिथल्या भीषण परिस्थितीमुळं त्यांच्यासोबत भारतातून आलेले डॉक्टर घरी परतले, पण कोटणीस त्या ठिकाणीच थांबले. त्यांच्यात असलेल्याया समर्पण भावामुळेच त्यांचा चीनमध्ये आदर केला जातो.
भारतात मात्र त्यांची आठवण कुणी फारशी काढताना दिसत नाही. फक्त काही पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख असतो. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या जीवनावर डॉ. कोटणीस की अमर कहानी हा चित्रपट काढला होता.
• १९४२: हिंदी-चीनी मैत्रीचे प्रतिक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१०)
- घटना :
१७५३: थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला
१८९२: इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली
१९००: अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
१९००: डेव्हीस कप टेनिस स्पर्धेची सुरवात.
१९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
१९६१: पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.
१९६१: ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया देशाचा जन्म.
१९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश. - मृत्यू :
• १७६१: मराठेशाहीतील प्रसिद्ध राजकारणी (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती) महाराणी ताराबाई भोसले यांचे निधन.
जन्म :
१८७८: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे , १९५०)
१८७०: भारतीय डॉक्टर आणि मिशनरी आयडा एस स्कडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे, १९६०)
१९१९: केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे, २००४)
१९४६: कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जन्म.