ऊसतोडणी मजुराच्या कोवळ्या बालिकेवर पुणे स्टेशनवर लैंगिक अत्याचार

पुणे : ऊसतोडणी काम संपल्याने मध्यप्रदेश मधील कुटुंब आई, वडील व चार लहान मुले पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने 16/02/26 रोजी रात्री पुणे रेल्वे स्टेशन येथे आले असता, एका नराधमाने चार वर्षांच्या कोवळ्या जीवावर लैंगिक अत्याचार करण्याची मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी या दुर्दैवी कुटुंबाच्याच शेजारी बसुन पुण्यापर्यंत प्रवास करत आला होता. या कुटुंबाला मध्यप्रदेशला जाणारी गाडी दूसऱ्या दिवशी सकाळी असल्याने रात्री ते कुटुंब रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपले असताना आरोपीने पीड़ित बालिका (वय वर्ष 4) हीस ती जागी असल्याचे पाहून खाऊचे आमिष दाखवून तिच्या आईवडिलांना न कळू देता प्लॅटफॉर्मच्या टोकाला दूर घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
रात्री पीड़िताचे वडिलांना ती झोपलेल्या ठिकाणी न आढळल्याने त्यांनी पोलिस स्टेशनवर येऊन मुलगी सापडत नसल्याचे कळविले. त्यानंतर Grp व RPF यांनी आजूबाजूला व CCTV फुटेज पाहून पीड़ित बालिकेला शोधले. पीड़ित बालिकेची वैद्यकीय तपासणी करून तिच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा कलम 137(2,)65(2), २१७ BNS 2023 पोस्को 4, 9,10 नुसार दाखल करण्यात आला. आरोपीदेखील मध्य प्रदेशमधील राहणारा असून त्याच दिवशी त्याला अटक करण्यात आली.





