‘श्री छत्रपती’ कारखाना सभासदांना २३६.३० कोटी रुपये अदा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : भवानीनगर, ता. इंदापूर येथील ‘श्री छत्रपती’ सहकारी साखर कारखान्याने ‘वजन चोख, पैसे रोख’ या तत्त्वाचे पालन करत चालू हंगामातील संपूर्ण उसाचे बिल (२३६ कोटी ३० लाख रुपये) सभासदांच्या खात्यात वर्ग केले आहे. शेवटच्या पंधरवड्यातील १८ कोटी १८ लाख रुपयांच्या बिलासह ऊसतोडणी वाहतुकीची देणीही पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली. याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक जाधव आणि अधिकारी उपस्थित होते.

कारखान्याने १०४ दिवसांच्या हंगामात ७,५६,२८५ टन उसाचे गाळप केले असून, सरासरी साखर उतारा ११.३६ टक्के इतका मिळाला आहे. यावर्षी कार्यक्षेत्रातील अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादनात घट झाली, परिणामी गाळपाचे अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. उसाची उपलब्धता वाढवण्यासाठी कारखान्याने को-८६०३२ आणि एमएस १०००१ या दोन वाणांच्या रोप लागवडीस प्रोत्साहन दिले आहे.


ऊसरोपे खरेदीसाठी सभासदांना ५० टक्के रक्कम आता भरायची असून, उर्वरित ५० टक्के रक्कम कारखाना सुरुवातीला भरेल व नंतर उसबिलातून कपात केली जाईल. तसेच, या उसासाठी प्रतिटन १०० रुपये अनुदान दिले जाणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली .

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »