‘श्रीनाथ म्हस्कोबा’ येथे ऊस तोडणी, वाहतूक मजुरांसाठी आरोग्य शिबिर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात शनिवार, दि.२५/११/२०२३ रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये ऊस तोडणी मजुरांची शुगर, बीपी तसेच सर्वसाधारण तपासणी करण्यात आली.

तपासणी केलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधे वाटप करण्यात आली. यामध्ये 163 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिरा बाबत लाभ घेण्यासाठी शेतकी विभागातील कर्मचाऱ्यांनी ऊस तोडणी वाहतुक मजुरांच्या कोपी यार्ड मध्ये प्रत्यक्ष जाऊन आरोग्य शिबिराची माहिती दिली.

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या परिपत्रकानुसार कारखान्याच्या ऊस गळीत हंगाम 2023-24 मध्ये ऊस तोडणी वाहतुकीसाठी आलेल्या मजुरांचे हंगाम कालावधीमध्ये तीन टप्प्यांत आरोग्य तपासणी शिबीर घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार हे शिबिर घेण्यात आले.

याप्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. डी.एम. रासकर म्हणाले की, कारखान्याचे अध्यक्ष श्री. पांडुरंग राऊत यांचे सूचनेनुसार दरवर्षी 1 जून रोजी आरोग्य शिबीर आयोजित केले जाते. यामध्ये रक्तदान शिबीर, महिलांचे सर्वसाधारण आरोग्य तपासणी, डोळ्यांची तपासणी, शुगर, बीपी इत्यादीची मोफत तपासणी करून आवश्यकतेनुसार पुढील मोफत उपचार केले जातात. तरी देखील शासनाच्या आदेशानुसार सदर आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कारखाना साईटवर निवासी डॉक्टर म्हणून डॉ. दीपक गजरे यांची नेमणूक केलेली आहे. तसेच तातडीच्या सेवेसाठी कारखान्याने स्वतंत्र वाहनचालकासह रुग्णवाहिका ठेवलेली आहे.

याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र राहूचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. पुजा चिंचोलीकर, डॉ. जयप्रकाश हुड, आरोग्यसेविका, श्रीमती रत्नमाला ठाकरे, उषा सावके, मीनाक्षी शिंदे, जनाबाई शिरसाट, आरोग्य सेवक, विनायक वांडरे, जितेंद्र शेंडगे, बापु झिटे, प्रयोगशाळा अधिकारी, गौरी गव्हाणे यानी सहभाग घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र राहू यांचे कारखान्यास वेळोवेळी सहकार्य लाभत असते. कारखान्याचे केन मॅनेजर श्री. एस. बी. टिळेकर, शेतकी अधिकारी श्री. एस. बी. शेंडगे तसेच कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »