श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर ऊसतोडणी कामगारांची मोफत आरोग्य तपासणी

पुणे : पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना स्थळावर स्थलांतरित ऊस तोडणी बंधु – भगिनी यांची मोफत आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (राहू) सहकार्याने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कारखान्याचा २०२५-२६ चा ऊस गळीत हंगाम सुरू झालेला आहे. दरवर्षी उस तोडणी वाहतूक मजूर कुटुंबासहित कारखाना परिसरात येत असतात. या स्थलांतरित झालेले ऊस तोडणी बंधु – भगिनी यांची आरोग्य तपासणी कारखान्यामार्फत दरवर्षी केली जाते. त्यानुसार या वर्षीही बुधवार, दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात ऊस तोडणी बांधवांकरिता कारखान्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, राहू, यांचे मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ऊस तोडणी मजुरांची सर्वसाधारण आरोग्य तपासणीमध्ये बी.पी., रक्तातील साखर, इ. तपासणी करण्यात आल्या. तसेच कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे मार्फत मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये प्रामुख्याने महिलांचे आरोग्य विषयक तपासणी करून त्यांना आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिरचा लाभ एकूण ५७ ऊस तोडणी वाहतूक बंधू-भगिनींनी घेतला आहे.

या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र, राहू च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पुजा चिंचोलीकर यांनी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. आहारामध्ये पालेभाजा जास्त खाणे, मिठाचा व तेलाचा वापर कमी करणे. लहान मुलांना आहारमध्ये दूध, अंडी यांचा समावेश करणे आदी सूचना केल्या.
या प्रसंगी डॉ. नेहा जेधे (समुदाय आरोग्य अधिकारी), डॉ. सुविधा नाईक (समुदाय आरोग्य अधिकारी), डॉ. प्रविण गजरे, सौ. रत्नमाला ठाकरे (आरोग्य सहायिका), योगेश पोटे (आरोग्य निरीक्षक), सौ. रोहिणी चौधरी (आरोग्य सेविका), श्री. प्रसाद माकर (आरोग्य सेवक), श्री. आकाश कदम (आरोग्य सेवक), श्री. बापू झिटे (आरोग्य सेवक), श्री. श्रीकांत थोरात (आरोग्य सेवक), तुषार खंडागळे (आरोग्य सेवक), सौ. कावेरी कुंभार (आशा स्वयंसेविका) यांनी आरोग्य तपासणीसाठी सहकार्य केले.
या प्रसंगी कारखान्याचे कार्याध्यक्ष, श्री. विकास (अण्णा) रासकर, संचालक, श्री. किसन शिंदे, श्री. भगवान मेमाणे, श्री. लक्ष्मण कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. डी. एम. रासकर, केन मॅनेजर श्री. एस. बी. टिळेकर, शेतकी अधिकारी, श्री. ए. बी. शेंडगे, लेबर ऑफिसर, आर. बी. मापारे तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कंत्राटदार व ऊस तोडणी बांधव उपस्थित होते.






