DSTA च्या अध्यक्षपदी सोहन शिरगावकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

उपाध्यक्ष पदासाठी बोखारे – डोंगरे लढत होणार

पुणे: साखर उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) (DSTA)’ च्या 2025 – 2028 या कार्यकाळासाठी सोहन एस. शिरगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र अधिकृत घोषणा सप्टेंबर २०२५ मध्येच होईल.

डीएसटीएच्या नियामक मंडळातील (Governing Council) २८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. आर. कुलकर्णी हे काम पाहत आहेत. त्यांना व्ही. एम. कुलकर्णी आणि डॉ. दशरथ ठवाळ सहकार्य करत आहेत.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत शिरगावकर आणि विक्रमसिंह शिंदे होते. मात्र शिंदे यांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने शिरगावकर यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. उपाध्यक्ष (महाराष्ट्र) पदासाठी दहा जणांचे अर्ज आले होते. एस. डी. बोखारे आणि डॉ. एम. के. डोंगरे वगळता इतरांनी माघार घेतल्याने दुरंगी सामना होणार आहे. हे पद वगळता इतर साऱ्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.

या निवडणुकीत अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यांमधील विविध झोनचे प्रतिनिधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील (अभियांत्रिकी, प्रक्रिया, कृषी, सह-उत्पादने, व्यवस्थापन) तज्ज्ञांचा समावेश आहे. अंतिम यादी खालीलप्रमाणे

प्रमुख पदांसाठीचे उमेदवार (1 पोस्ट प्रत्येकी):

  • अध्यक्ष:
    • श्री. शिरगावकर सोहन एस.
  • उपाध्यक्ष – महाराष्ट्र:
    • श्री. बोखरे एस. डी.
    • डॉ. डोंगरे एम. के.
  • उपाध्यक्ष – गुजरात:
    • श्री. पटेल एम.
  • उपाध्यक्ष – कर्नाटक:
    • श्री. माने सी. जी.
  • साखर आणि संलग्न उद्योगांचे उत्पादक:
    • श्री. मारवाडकर सतीश
    •  

तांत्रिक पदांसाठीचे उमेदवार (1 पोस्ट प्रत्येकी):

  • तंत्रज्ञ – अभियांत्रिकी:
    • श्री. घोडगावकर एस. व्ही.
  • तंत्रज्ञ – प्रक्रिया:
    • श्री. देव एस. बी.
  • तंत्रज्ञ – कृषी:
    • या पदासाठी कोणताही उमेदवार नाही (एस. एस. जोशी यांचा अर्ज बाद, तर डी. एस. फाळके यांची माघार)
  • तंत्रज्ञ – सह-उत्पादने:
    • श्री. श्रीकांत बी. एच.
  • तंत्रज्ञ – व्यवस्थापन:
    • श्री. कोलते व्ही. व्ही.
    •  

महाराष्ट्र झोन आणि इतर राज्यांमधील प्रतिनिधी (अनेक पोस्ट):

  • बी – 1. महाराष्ट्र झोन – 1 (5 पोस्ट):
    • श्री. बोरुडे एस. डी.
    • श्री. गावित डी. बी.
    • श्री. शिंदे एस. पी.
    • श्री. माने एस. जी.
    • श्री. घुले भास्कर एस.
  • बी – 2. महाराष्ट्र झोन – 2 (5 पोस्ट):
    • श्री. माटे पी. एम.
    • श्री. कुलकर्णी यशवंत एस.
    • श्री. माने आर. बी.
    • श्री. सलगर समीर बी.
    • श्री. पाटील डी. एस.
  • बी – 3. महाराष्ट्र झोन – 3 (2 पोस्ट):
    • श्री. कर्णे टी. एम.
    • श्री. येवले जी. जी.
  • बी – 4. कर्नाटक (4 पोस्ट):
    • श्री. पाटील एस. बी.
    • श्री. कामते बी. डी.
    • डॉ. सिदनाळे व्ही. बी.
  • बी – 5. गुजरात (2 पोस्ट):
    • श्री. पबसेटवार बालाजी डी.
    • (जागा दोन असल्या तरी ए. आर. पाटील यांचा बाद झाल्याने एक जागा रिकामी)

या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती, त्यामुळे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मावळते अध्यक्ष एस. बी. भड यांनी त्यांच्या कार्यकाळात भरीव योगदान दिले. संस्थेला नावारूपाला आणले आणि एकंदरित त्यांच्या नेतृत्वाखालील डीएसटीएने प्रगती आणि लोकप्रियतेची नवी उंची गाठली. त्यामुळे नवे अध्यक्ष सोहन शिरगावकर यांच्याकडून अधिक अपेक्षा असणार आहेत. नव्या कार्यकारी मंडळाला ‘शुगरटुडे’च्या शुभेच्छा! आणि एस. बी. भड यांचे त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल खूप खूप अभिनंदन!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »