‘सोमेश्वर’चा उच्चांकी दर, एफआरपीपेक्षा रू. ६९७ जादा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना प्रति टन ३५७१ रुपये इतका अंतिम ऊसदर देण्याचा निर्णय १६ ऑगस्ट रोजी घेतला. हा दर उच्चांकी असून, ‘एफआरपी’पेक्षा तब्बल ६९७ रुपये जास्त आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने मासिक सभेमध्ये २०२३-२४ या हंगामात तुटलेल्या उसाला प्रतिटन ३५७१ रुपये इतका अंतिम दर देण्याचा निर्णय घेतला.

कारखान्याने मागच्या हंगामात १५ लाख २३ हजार टन इतके गाळप केले आणि १२.२१ टक्के उच्चांकी उताऱ्यासह १८ लाख २६ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली. पहिली उचल एकरकमी तीन हजार रुपये प्रतिटन दिली होती.

हंगाम संपल्यावर शंभर रुपये प्रतिटनाचा दुसरा हप्ता दिला होता. आता सप्टेंबरमध्ये पुन्हा प्रतिटन शंभर रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहेत. तर, दिवाळीला उरलेले ३७१ रुपये प्रतिटन अंतिम बिल दिले जाणार आहे. त्यामधून ठेव व भागविकास निधी कपात करण्यासंदर्भात वार्षिक सभेत सभासदांशी चर्चा करून निर्णय होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन, सभासदांचा पाठिंबा, कामगार-अधिकाऱ्यांची व तोडणी यंत्रणेची साथ यामुळे संचालक मंडळ हा निर्णय घेऊ शकले, असेही ते म्हणाले.

सोमेश्वर कारखान्याची ढोबळ एफआरपी ३७५२ रुपये प्रतिटन होती. ८७८ रुपये तोडणी वाहतूक खर्च वजा जाता २८७४ रुपये प्रतिटन निव्वळ एफआरपी होते. त्यामुळे अंतिम दर एफआरपीपेक्षा ६९७ रुपयांनी अधिक आहे. याबाबतीत सोमेश्वर राज्यात अग्रस्थानी आहे.

सोमेश्वर कारखान्याने विलंबाने तुटणाऱ्या उसाला जानेवारीनंतर ७५ ते २०० रुपये प्रतिटन, असे बारा कोटी अतिरिक्त अनुदान दिले होते. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ऊस तुटलेल्या शेतकऱ्यांना ३५७१ रुपये, जानेवारीत ३६४६ रुपये, फेब्रुवारीत ३६७१ रुपये, मार्चमध्ये ३७२१ रुपये; तर एप्रिलमध्ये ३७७१ रुपये प्रतिटन असा समाधानकारक ऊसदर मिळणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Leave a Reply

Select Language »