ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक झाल्यास कारवाई

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी चालू गाळप हंगामात येणार नाहीत, याची कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

त्यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार ऊस तोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांचेकडून ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास जिल्ह्यातील साखर कारखान्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्या आहेत. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी केल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्व प्रादेशिक उपसंचालकांनी केले आहे.

ऊस तोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणी करताना, ऊस पिक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख पैशांची व अन्य वस्तू, सेवा यांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते, ऊस योग्य प्रकारे तोडला गेला नाही अशा प्रकारच्या आर्थिक पिळवणूकीच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहेत.
सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांच्या सीईओ- जनरल मॅनेजर, यांना प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »