”श्रीनाथ म्हस्कोबा”तर्फे शेतकऱ्यांना साखर वाटप

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यातर्फे दिवाळी सणानिमित्त सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अल्पदरात साखर वाटप करण्यात येत आहे. कारखान्याचे संचालक व माजी उपसभापती अनिल भुजबळ यांच्या हस्ते वाटपास सुरुवात झाली.

कारखान्यातर्फे तळेगाव ढमढेरे गटातील सभासद शेतकरी व ऊस उत्पादकांना प्रति किलो २० रुपये प्रमाणे साखर वाटप केली जात आहे. येथील कार्यालयात टाकळी भीमा, विठ्ठलवाडी, कासारी, शिवतक्रार म्हाळुंगी, निमगाव म्हाळुंगी, रांजणगाव गणपती, डिंग्रजवाडी, दरेकरवाडी, धानोरे, पारोडी, सणसवाडी, करंजावणे व दहिवडी या गावातील ऊस उत्पादकांना साखर वाटप केली जात आहे. सदर साखर वाटप येथील कार्यालयात दहा नोव्हेंबरपर्यंत केली जाणार असल्याचे संचालक अनिल भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी संतोष भुजबळ, दादाभाऊ नरके, सतीश भुजबळ, उमेश भुजबळ, नवनाथ भुजबळ, तसेच कारखान्याचे कर्मचारी काका कंद, मनोहर तांबे, तानाजी शिंदे, धनाजी झोरे, अमोल भुजबळ व शेतकरी उपस्थित होते.

यावर्षी १ नोव्हेंबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत वीस रुपये प्रति किलो दराने साखर सभासदांना दिली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे दहा, वीस आणि पन्नास किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये साखरेचे वितरण होत आहे.

कारखान्याच्या हडपसर ऑफिस, राहू, पारगाव, रांजणगाव सांडस, खामगाव, अष्टापूर, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, उरुळी कांचन आदी गटामधून वितरण करण्यात येत आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी वेळेत साखर विक्री केंद्रातून साखर घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »