साखर निर्यातीवरील निर्बंधांना वर्षाची मुदतवाढ
मात्र निर्यात कोटा लवकरच जाहीर होणार
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक असलेल्या भारताने साखर निर्यातीवरील निर्बंध ऑक्टोबर 2023 पर्यंत एक वर्षाने वाढवले आहेत, असे सरकारने एका अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र हे निर्बंध अमेरिका आणि युरोपीयन युनियनला होणाऱ्या साखर निर्यातीला लागू नसतील.
केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने याबाबतची अधिसूचना शुक्रवारी उशिरा जारी केली.
सरकारच्या या निर्णयामुळे कच्ची साखर, रिफाइन्ड साखर आणि पांढरी साखर निर्यात करण्यावर बंदी राहील. असे असले, तरी गेल्या वर्षीप्रमाणे सरकार, निर्यात कोटा जाहीर करण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबरपर्यंत त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता असून, ८० लाख टनांपर्यंत परवानगी मिळेल, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. कारखानावार कोटा जाहीर होण्याची शक्यता आहे.
गेल्या साखर हंगामात ११२ लाख टन साखर निर्यात झाली होती. कसल्याही अनुदानाविना एवढ्या मोठ्या प्रमाणावर साखर निर्यात होण्याचा हा उच्चांक आहे.
[…] […]