युद्धामुळे साखर निर्यात संकटात?

आवडल्यास ही बातमी शेअर करा

देशात १५ लाख टन साखरेचा अतिरिक्तसाठा राहण्याची शक्यता

पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता वाढली असून याचा मोठा फटका भारतीय साखर उद्योगाला बसला आहे. निर्यातीचे मार्ग विस्कळीत झाल्यामुळे देशात सुमारे १५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

निर्यात ठप्प: केंद्राने २० लाख टन निर्यातीचा कोटा दिला असला तरी, आतापर्यंत केवळ ४ लाख टन निर्यात झाली आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे वाहतुकीत अडथळे येत असल्याने एकूण निर्यात ५ लाख टनांच्या पुढे जाण्याची शक्यता कमी आहे.

महत्त्वाचे मुद्दे

उत्पादन आणि मागणी: देशात यंदा २९५ ते ३०० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. मात्र, मागणीचा कल पाहता देशांतर्गत खप २७० लाख टनांपर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

दराव रदबाव: आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर गेल्या वर्षीच्या ४,५०० रुपयांवरून आता ३,६०० – ३,७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. अतिरिक्त साठ्यामुळे देशांतर्गत बाजारातही दर कोसळण्याची भीती आहे.

शेतकऱ्यांवर परिणाम: साखरेचे दर पडल्यास साखर कारखान्यांच्या नफ्यावर परिणाम होईल, ज्याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी (FRP) पेमेंटला बसू शकतो.

आकडेवारीवर एक नजर

  • अपेक्षित उत्पादन: २९५-३०० लाख टन.
  • निर्यात कोटा: २० लाख टन.
  • झालेली निर्यात: ४ लाख टन.
  • अतिरिक्त साठा: १५ लाख टन.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »