वजन काटे ऑनलाइन निर्णयाचे स्वागत

ऊस हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. शाश्वत उत्पन्न देणार पीक असल्याने अलीकडे या पिकाच्या लागवडीत बागायती भागामध्ये वाढ झाली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या पिकाची सर्वाधिक शेती होते. या विभागात अलीकडे उत्पन्नाची हमी म्हणून लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.
मात्र असे असले तरी ऊस उत्पादकांना अनेक आव्हानांना देखील सामोरे जावे लागते. ऊस उत्पादकांची ऊसतोड मजूर, ऊस वाहतूकदार यांच्याकडून कायमच लूट होत असते. याशिवाय कारखानदारांकडूनही ऊस उत्पादकांची लूट होते.
ऊस उत्पादक शेतकरी बांधव कारखान्यात ऊसाच्या वजनात झोल होत असल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. कारखान्यामध्ये असलेल्या ऊस वजन काट्यात मोठी तफावत असल्याचे शेतकरी नमूद करतात. त्यामुळे या काटामारीने ऊस उत्पादकांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता साखर कारखान्यातील काटे हे ऑनलाइन केले जाणार आहेत.