साखरेचा कोटा कमी देऊनही दरात घसरण!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : नोव्हेंबर महिन्यासाठी साखरेचा कोटा कमी देऊनही ग्राहकांकडील खरेदी रोडावली आहे, त्‍यामुळे राज्‍यातील घाऊक बाजारपेठेत साखरेचे दर प्रति क्‍विंटलला ५० रुपयांनी घटल्‍याचे सांगण्यात आले. बाजारात एस ३० ग्रेड साखरेचा प्रति क्‍विंटलचा दर हा ४१५० ते ४२०० रुपयांनी घटून ४१०० ते ४१२५ रुपयांपर्यंत खाली दिसून आले. साखरेच्या मागणीची स्थिती ‘जैसे थे’ राहिल्यास बाजार हा मंदीतच राहील, असा अंदाज साखर उद्योगामधील जाणकार व्यापारी व्यक्त करत आहेत.

नोव्हेंबरसाठी अपुरा कोटा दिल्यामुळे साखरेचे दर वधारण्यास सुरुवात होती मात्र, चालू तारखेचा आठवडा असूनही बाजारात ग्राहकांची वर्दळ जवळपास नसल्‍याचे चित्र आहे. २०२५-२६ चा गाळप हंगाम नुकताच सुरु झाल्यामुळे नवीन साखर उत्पादन हाती येत असल्यानेही मंदीस हातभार लागल्याचे बोलले जाते. जेमतेम मागणीमध्ये साखरेची आवक चांगली होत आहे. त्यामुळे दरात पन्नास रुपयांनी घसरण झाल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी दिली.

देशात साखरेचा हंगामपूर्व शिल्लक साठा १७ ते २० लाख मे. टनाइतका आहे. चालूवर्षी सुमारे ३४३ लाख टनाइतके साखर उत्पादन अपेक्षित धरण्यात येत आहे. म्हणजेच एकूण ३६० ते ३६३ लाख टन साखर उपलब्धतेचा प्राथमिक अंदाज आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »