व्हेनेझुएलामध्ये ऊस जाळण्याची पद्धत कायम

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कॅरॅकस : व्हेनेझुएला या छोट्या देशामध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र तेथे आजही तोडणीपूर्वी ऊस जाळण्याची पद्धत कायम आहे. या पद्धतीचा आम्हाला फायदा होतो, असे तेथील साखर क्षेत्राचे मत आहे.

अवघ्या तीन कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशाची कॉफी, मका, तांदूळ ही प्रमुख पिके आहेत, त्यानंतर उसाचा क्रमांक लागतो. ऊस तोडणीच्या अवस्थेत आल्यानंतर तो पद्धतीशीरपणे जाळला जातो आणि तोडणी करून साखर कारखान्यांना पाठवला जातो.

तोडणीआधी ऊस जाळल्याने त्यातील घातक किडे आणि इतर जीवजंतू मरून जातात आणि मनुष्याद्वारे तोडणी करताना काही अपाय होत नाही, असा तेथील समज आहे. या पद्धतीत कार्बन डाय ऑक्साईड जास्त निर्माण होत नाही, असे ते मानतात.

ऊस तोडणीची संपूर्ण पद्धत पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा…

Courtesy – Colsugar

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »