उसापासून बनवला ख्रिसमस ट्री
चेन्नई: क्राउन प्लाझा चेन्नई अड्यार पार्क आणि शेरेटन ग्रँड चेन्नई रिसॉर्ट अँड स्पा – या दोन पंचतारांकित हॉटेल्समध्ये यंदा पर्यावरणपूरक ख्रिसमस ट्री तयार केले आहेत. नाताळ सणाच्या निमित्ताने ख्रिसमस ट्री ला खूप महत्त्व आहे. तो उसाच्या चिपाडापासून देशात पहिल्यांदाच बनवण्यात आला आहे.
क्राउन प्लाझा चेन्नईच्या मते, ख्रिसमस ट्रीसाठी प्राथमिक सामग्री म्हणून 200 किलो उसाच्या अवशेषांचा वापर करण्यात आला. त्यासाठी हॉटलेने RRR चित्रपटातील संकल्पना निवडली – प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करा, पुनप्रक्रिया करा आणि पुनर्वापर करा.
शहरातील ऊस रस विक्रेत्यांकडून ऊस गाळप केल्यानंतर राहिलेली चिपाडे उन्हात वाळवली, त्यावर पेंटिंग करून त्यावर प्रक्रिया करून त्याचे झाड बनवण्यात आले.
हॉटेल टीमने फ्यूज केलेले बल्ब देखील गोळा केले आणि ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी वस्तू बनवण्यासाठी पुन्हा रिसायकलिंग आणि अपसायकल केले.
या हॉटेलने 23 डिसेंबर ते 31 डिसेंबर या सणासुदीच्या कालावधीत 1,000 रुपयांपेक्षा जास्त असलेल्या प्रत्येक रेस्टॉरंटच्या बिलातून 100 रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे, कलैसेल्वी करुणालय सोशल वेलफेअर सोसायटी (KKSS), एक सेवाभावी संस्थेला ही मदत दिली जाईल.
दुसरीकडे, शेरेटन ग्रँड चेन्नईच्या बीच रिसॉर्टने नारळ, लाकूड आणि पर्यावरणास अनुकूल पेंट्सने ख्रिसमस ट्री तयार केला आहे.