97.5 लाख मे. टन साखर उत्पादन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

१३८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला

पुणे : महाराष्ट्रात २०२५–२६ ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून २१० साखर कारखान्यांपैकी १३८ कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला आहे. साखर आयुक्तालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण साखर उत्पादन ९७५.२२ लाख क्विंटल म्हणजेच 97.5 लाख मे. टन इतके झाले आहे. मागच्या वर्षीचा आकडा केव्हाच मागे टाकला आहे. आतापर्यंत १०३१.०४ लाख मेट्रिक टन (LMT) उसाचे गाळप करण्यात आले आहे. सध्या राज्यातील सरासरी साखर उतारा (रिकव्हरी) ९.४६% आहे.

विभागवार कामगिरी:

  • कोल्हापूर विभाग: साखर उत्पादन आणि रिकव्हरी दर या दोन्ही बाबतीत हा विभाग राज्यात आघाडीवर आहे. या विभागातील सर्व ३९ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. कोल्हापूर विभागात २०९.८६ लाख मेट्रिक टन (LMT) उसाचे गाळप करून राज्यातील सर्वाधिक ११.०१% उतारा मिळवला आणि २३१.०७ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. या विभागातील सर्व कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे.
  • पुणे विभाग: पुणे विभागात ३२ पैकी २० साखर कारखाने बंद झाले आहेत. या विभागात २२३.३८ लाख मेट्रिक टन (LMT) उसाचे गाळप करून ९.८३% उताऱ्यासह २१९.५४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
  • सोलापूर विभाग: सोलापूर विभागात ४९ पैकी ३६ कारखाने बंद झाले आहेत. येथे २१८.६४ लाख मेट्रिक टन (LMT) उसाचे गाळप करून १८७.६८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले असून या विभागाचा उतारा ८.५८% आहे.
  • अहिल्यानगर विभाग: हा विभाग गाळपाच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. येथे १२४.९९ लाख मेट्रिक टन (LMT) उसाचे गाळप करून ११३.३४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या विभागाचा उतारा ९.०७% असून २८ पैकी २३ कारखाने बंद झाले आहेत.
  • छत्रपती संभाजीनगर विभाग: येथे आतापर्यंत ११७.०६ लाख मेट्रिक टन (LMT) उसाचे गाळप होऊन ९५.९५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या विभागाचा उतारा ८.२०% आहे. येथे २५ पैकी ८ कारखाने बंद झाले आहेत.
  • नांदेड विभाग: नांदेड विभागात १२३.२७ लाख मेट्रिक टन (LMT) उसाचे गाळप करून ११५.७३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या विभागाचा उतारा ९.३९% असून ३० पैकी ११ कारखाने बंद झाले आहेत.
  • अमरावती विभाग: येथे ११.८९ लाख टन उसाचे गाळप करून ११.०७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या विभागाचा साखर उतारा ९.३१% असून अद्याप एकही कारखाना बंद झालेला नाही.
  • नागपूर विभाग: नागपूर विभागात १.९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून ०.८१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या विभागाचा उतारा ४.२३% आहे. येथे ३ पैकी १ कारखाना बंद झाला आहे.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »