सर्व २१० साखर कारखाने बंद, गळीत हंगामाची अधिकृत सांगता

पुणे : राज्याचा ऊस गळीत हंगाम अखेर अधिकृतपणे संपला आहे. साखर आयुक्तालयाने परवा जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार यंदा २१० कारखान्यांना गळिताचे परवाने दिले होते. ते सर्व कारखाने १५ एप्रिल अखेर बंद झाले.
२०२२-२३ या गळीत हंगामासाठी सहकारी १०६ आणि खासगी १०४ अशा २१० कारखान्यांना परवाने दिले होते. या सर्व कारखान्यांची प्रति दिन गाळप क्षमता ८ लाख ८४ हजार ९५० मे. टन होती. या संपूर्ण हंगामात एकूण १०५५ लाख मे. टन ऊस गाळप आणि त्यापासून १०५३ लाख टन साखर तयार झाली, राज्याचा सरासरी उतारा सुमारे दहा टक्के (९.९८ टक्के) राहिला.
गेल्या वर्षीची तुलना करता, यंदाचा हंगाम खूप लवकर उरकला आहे. गेल्या वर्षी १९९ साखर कारखान्यांना परवाने दिले होते, तर १५ एप्रिलपर्यंत ५५ साखर कारखान्यांच्या गाळपाची सांगता झाली होती.