४६ कारखान्यांकडे अद्याप ३३१ कोटींची एफआरपी थकबाकी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

 किसनवीर टॉपवर, साखर आयुक्तांकडून आकडेवारी जाहीर

पुणे : २०२२-२३ चा हंगाम अर्धा संपत आला, तरी राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी थकबाकी देणे आहे. साखर आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार तब्बल ४६ साखर कारखान्यांकडे ३३१ कोटींची एफआरपी रक्कम अद्याप बाकी आहे.

त्यामध्ये भुईंजचा किसनवीर सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे, त्याच्याकडे एकूण ५० कोटींहून अधिक एफआरपी बाकी आहे. त्यानंतर २४ कोटींच्या थकबाकीसह न्यू फलटण साखर कारखान्याचा थकबाकीत दुसरा नंबर लागतो.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी १ डिसेंबर रोजी हंगाम २०२२-२३ चा पाक्षिक रिपोर्ट जारी केला. त्यात गतवर्षीच्या एफआरपी थकबाकीसह यंदाच्या ३० नोव्हेंबर अखेरपर्यंतच्या थकबाकीचा आढावा घेण्यात आला आहे.

या आकडेवारीनुसार पन्नासपेक्षा अधिक साखर कारखाने ३० नोव्हेंबरपर्यंतची एफआरपी देण्यात आघाडीवर आहेत. त्यांनी शंभर टक्के एफआरपी रक्कम अदा केली आहे. सोलापूरचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ८७ कोटींच्या रकमेसह राज्यात आघाडीवर आहे. त्यानंतर विघ्नहर ३४ कोटी, पांडुरंग सहकारी २९ कोटी या कारखान्यांचा क्रमांक लागतो.

यंदाच्या हंगामात शून्य एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्याही ७० पेक्षा अधिक आहे. या कारखान्यांमध्ये रत्नापाण्णा कुंभार साखर कारखाना, आजरा सहकारी (शाहूवाडी), अथणी शुगर – शाहूवाडी, विश्वासराव नाईक सह. कारखाना, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी, दौंड शुगर, बारामती ॲग्रो, संत तुकाराम सहकारी, छत्रपती सहकारी, घोडगंगा, नीराभीमा, अजिंक्यतारा, बाळासाहेब देसाई साखर, स्वराज इंडिया, कृष्णा सहकारी, शंकरराव काळे सहकारी, शंकरराव कोल्हे सहकारी, भोगावती सहकारी आदी कारखान्यांचा समावेश आहे.

FRP DUES
FRP 100% PAID
CHART SHOWING FACTROIES WHO PAID 100 PC FRP

वरील आकडे लाख रुपयांमध्ये


वरील आकडे कोटी रुपयांमध्ये

हे कारखानेही शंभर नंबरी

शंभर टक्के एफआरपी रक्कम अदा करणाऱ्या कारखान्यांमध्ये आजरा शेतकरी सहकारी (आजरा), छत्रपती राजाराम सहकारी (कसबा बावडा), छत्रपती शाहू सहकारी (कागल), कल्लापाण्णा आवाडे कारखाना (हुपरी), सदाशिवराव मंडलिक कारखाना (कौलगे), कुंभी कासारी, शरद सहकारी, वारणा सहकारी, डी. वाय. सहकारी, दालमिया भारत शुगर (आसुर्ले पोर्ले), गुरुदत्त शुगर, एको केन एनर्जी, अथर्व इंट्राट्रेड, राजारामबापू सहकारी कारखान्याचे चारही युनिट, सोनहिरा सहकारी, क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी, सद्‌गुरू श्री. श्री. शुगर, भीमाशंकर सहकारी (आंबेगाव), श्री दत्त शेतकरी सहकारी, श्री दूधगंगा सहकारी या कारखान्यांचाही समावेश आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »