पाच-सहा कारखाने साखर उत्पादन थांबवणार
पुणे : महाराष्ट्रातील पाच ते सहा कारखाने पुढील हंगामापासून साखर उत्पादन पूर्णपणे बंद करून, थेट इथेनॉल उत्पादनाकडे वळतील, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतीच दिली.
महाराष्ट्राची ब्राझीलच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे हे द्योतक आहे. इथेनॉल मार्केट विस्तारित होत आहे. साखर उत्पादनाऐवजी थेट ‘ज्यूस टू इथेनॉल’ उत्पादन करणे काही साखर कारखान्यांना उचित वाटते. भविष्यात थेट इथेनॉल उत्पादन करण्याचे प्रमाण वाढेल, असे आयुक्त म्हणाले.
एकूण 22 जिल्ह्यांमध्ये साखर साखरेचा गाळप हंगाम झाला.
यंदा सर्वात कमी दिवसांचा हंगाम वर्धा जिल्ह्यामध्ये 79 दिवस, तर सर्वाधिक 140 दिवसांचा गाळप हंगाम जालना जिल्ह्यामध्ये झाला.
या हंगामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जास्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात आली. मागच्या वर्षी 12 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात आली होती. यावर्षी 16 लाख टन साखर इथेनॉलकडे वर्ग झाली. म्हणून यंदा साखरेचे उत्पादन जरी कमी झाले, असले तरी चार लाख टन जादा साखर इथेनॉल निर्मितीसाठी गेली आहे, याचा पण विचार करायला पाहिजे.
साखर उताऱ्यात इथेनॉल निर्मिती गृहित धरणार
आम्ही जे दररोजचे गाळपाचे आकडे पाहिले, असता असे दिसते की दहा टक्के रिकव्हरी आहे; शेतकऱ्याना पैसे देताना, उताऱ्यात १.४० ते १.४५ टक्क्यांची वाढ विचारात घेतली जाईल. कारण तेवढी साखर इथेनॉलकडे गेलेली आहे. त्याचे प्रत्येक कारखान्याचे प्रमाणीकरण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करते.
साखरचे ‘डायव्हर्सन’ साधारणत: जास्तीत जास्त दीड टक्क्यापर्यंत येते. कमीत कमी १.०० ते १.१० टक्के विचारात घेतल्यास, या वर्षीचा सरासरी उतारा ११.२५ टक्क्यांवर जातो. रिकव्हरीमध्ये फारसा बदल झालेला आपल्याला दिसत नाही.
अनेक साखर कारखाने ज्यूस तो इथेनॉल निर्मितीच्या मागे लागले आहे आणि मला वाटते पुढच्या वर्षी किमान पाच ते सहा साखर कारखाने साखरच उत्पादित करणार नाहीत, अशा स्थितीमध्ये आहेत, असे साखर आयुक्त म्हणाले. मात्र या कारखान्याची नावे त्वरित जाहीर करण्याचे त्यांनी टाळले.