बिपिनचंद्र पाल

आज मंगळवार, मे २०, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक ३०, शके १९४७
सूर्योदय : ०६:०२ सूर्यास्त : १९:०८
चंद्रोदय : ०१:२७, मे २१ चंद्रास्त : १२:२५
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – ०४:५५, मे २१ पर्यंत
नक्षत्र : धनिष्ठा – १९:३२ पर्यंत
योग : इन्द्र – ०२:५०, मे २१ पर्यंत
करण : बालव – १७:२८ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०४:५५, मे २१ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : मकर – ०७:३५ पर्यंत
राहुकाल : १५:५२ ते १७:३०
गुलिक काल : १२:३५ ते १४:१३
यमगण्ड : ०९:१९ ते १०:५७
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : ०८:३९ ते ०९:३२
दुर्मुहूर्त : २३:३० ते ००:१३, मे २१
अमृत काल : ०९:०७ ते १०:४३
वर्ज्य : ०२:३४, मे २१ ते ०४:०७, मे २१
आज हवामान विज्ञान दिवस आहे.
नीरव-तार हृदय में,
गूँज रहे हैं मंजुल-लय में;
अनिल-पुलक से अरुणोदय में।
नीरव-तार हृदय में—
चरण-कमल में अर्पण कर मन,
रज-रंजित कर तन,
मधुरस-मज्जित कर मम जीवन,
चरणामृत-आशय में।
नीरव-तार हृदय में—
नित्य-कर्म-पथ पर तत्पर धर,
निर्मल कर अन्तर,
पर-सेवा का मृदु पराग-भर,
मेरे मधु-संचय में।
नीरव-तार हृदय में—
१९००: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर, १९७७)
”दासता मानवीय आत्मा के विरुद्ध है । ईश्वर ने सभी प्राणियों को स्वतन्त्र बनाया है । ” – बिपिन चंद्र पाल
भारतीय क्रांतिकारकांच्या विचारांचे जनक म्हणून ओळखले जाणारे बिपिन चंद्र
पाल शिक्षक, लेखक, पत्रकार तसेच जनमानसात विचारांचा ठाव घेणारे वक्ते होते.
१९०५ मध्ये बंगालच्या फाळणी विरोधात जनसमर्थन मिळवले होते. तसेच स्वदेशीचा आग्रह , परदेशी मालावर बहिष्कार, घडवून आणण्यात अग्रणी होते. एक जहाल मतवादी हि त्यांची विशेष ओळख होती.
इंडियन नेस्नलिज्म, नैस्नल्टी एंड एम्पायर,स्वराज एंड द प्रेजेंट सिचुएशन,द बेसिस ऑफ़ रिफार्म, द ऑफ़ इंडिया,द न्यू स्पिरिट,स्टडीज इन हिन्दुइस्म,क्वीन विक्टोरिया – बायोग्राफी इ. पुस्तकांचे लेखन केले.
१९३२: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८)
- घटना :
५२६: सिरीया आणि अँटोचियात झालेल्या एका भूकंपात सुमारे ३,००,००० लोकांचा मृत्यू.
१४९८: पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा हे भारताच्या कालिकत (कलकत्ता) बंदरात दाखल झाले.
१५४०: छायाचित्रकार अब्राहम ऑरटेलियस यांनी थॅट्रम ऑरबिस टेरारम हा पहिला आधुनिक अॅटलास प्रकाशित केला.
१८७३: लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्स चे पेटंट घेतले.
१८९१: थॉमस एडीसन यांनी किनेटोस्कोप चे पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केले
१९०२: क्यूबा देश अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.
१९४८: चिआंग काई शेक चीन गणराज्यचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
१९९६: देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द’इयर हा पुरस्कार जाहीर.
• मृत्यू :
१५७१: राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु, केशवचैतन्य ऊर्फ बाबाचैतन्य यांनी जुन्नरजवळील ओतूर येथे समाधी घेतली.
१७६६: इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च, १६९३)
१८७८: समाजसुधारक व संस्कृत विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.
१९६१: कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई विष्णूपंत चितळे यांचे निधन.
१९९२: पद्मश्री पुरस्कार सन्मानित सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगांवकर यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर, १९१६)
१९९४: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. ब्रम्हानंद रेड्डी यांचे निधन. (जन्म: २८ जुलै,१९०९)
१९९७: इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर यांचे निधन.
२०१२: भारतीय मानववंश शास्त्रज्ञ लीला दुबे यांचे निधन. (जन्म: २७ मार्च ,१९२३)
जन्म :
१८५०: केसरी चे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च ,१८८२)
१८८४: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर, १९२२)