लोकसंख्या दिन

आज शुक्रवार, जुलै ११, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक २०, शके १९४७
सूर्योदय : ०६:०८ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : २०:०१ चंद्रास्त : ०६:१७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : प्रतिपदा – ०२:०८, जुलै १२ पर्यंत
नक्षत्र : उत्तराषाढा – पूर्ण रात्रि पर्यंत
योग : वैधृति – २०:४५ पर्यंत
करण : बालव – १४:१० पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०२:०८, जुलै १२ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : धनु – १२:०८ पर्यंत
राहुकाल : ११:०५ ते १२:४४
गुलिक काल : ०७:४७ ते ०९:२६
यमगण्ड : १६:०२ ते १७:४१
अभिजित मुहूर्त : १२:१८ ते १३:१०
दुर्मुहूर्त : ०८:४६ ते ०९:३९
दुर्मुहूर्त : १३:१० ते १४:०३
अमृत काल : ००:०१, जुलै १२ ते ०१:४०, जुलै १२
वर्ज्य : १४:०९ ते १५:४
आज आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन आहे
२००६: मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ८१७ लोक जखमी झाले. हया हल्ल्यामुळे मुंबईकरांच्या १२ मार्च १९९३च्या मुंबईवरील बॉम्बहल्ल्याच्या दुर्दैवी आठवणी ताज्या झाल्या.
ह्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली
अश्विनी ये ना, ये ना
प्रिये, जगु कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणिबाणी गं
ये ना प्रिये, तू ये ना प्रिये
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला
प्रिया, उगाच संशयात मी बुडाले रे
तुला छळून मी जळून गेले रे
ये साजणा, तू ये साजणा
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
शांताराम नांदगावकरांनी ७० आणि ८० अशा दोन दशकांमध्ये एक सिद्धहस्त गीतकार म्हणून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे वलय निर्माण केले होते. दशरथ पुजारी, कमलाकर भागवत, प्रभाकर जोग, अशोक पत्की, अनिल मोहिले, अरुण पौडवाल यासारख्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. ‘रजनीगंधा’, ‘बंदिनी’, ‘बकुळीच्या तळी’, ‘सजल नयन’ या ध्वनिमुद्रिकांना अतिशय लोकप्रियता मिळाली.
‘सूर सनईत नादावला’, ‘हे सावळ्या घना’, ‘विसर प्रीत विसर गीत’ यांसारखी भावविभोर गीते व ‘येऊ कशी प्रिया’, ‘रुपेरी वाळूत’, ‘अनुरागाचे थेंब झेलती’ अशी अल्लड प्रेमगीते ज्या भावुकतेने नांदगावकरांनी लिहिली, त्याच लेखणीने त्यांनी ‘ससा तो ससा’, ‘बे एके बे’ ही सहजसोपी बाळबोध बालगीतेही लिहिली.
भक्तिरसपूर्ण अशा ‘हरीनाम मुखी रंगते’, ‘पंढरीनाथा झडकरी आता’, ‘प्रभू मी तुझ्या करातील वीणा’ या रचनाही त्यांनी केल्या.
• २००९: सिद्धहस्त गीतकार शांताराम नांदगावकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर , १९३६)
नारायण हरी आपटे – इंग्रजांची परकीय नोकरी करावयाची नाही अशी हिंमत बाळगून केवळ लिखाण करून संसार करणारे ते काही लेखकांपैकी एक होत.
आपटे हे ‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे काही काळ सहसंपादक होते. साताऱ्यातून ते आल्हाद साप्ताहिक प्रसिद्ध करत. कोरेगावहून त्यांचे स्वतःचे ‘मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे.
नारायण हरी आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर प्रभातने ‘कुंकू’ चित्रपटाची निर्मिती करून जरठकुमारी विवाह ही त्या काळातील ज्वलंत समस्या चव्हाट्यावर मांडली. ट्रेलरची पद्धत कुंकू चित्रपटापासून सुरू झाली. ट्रेलरमुळे सिनेप्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती.
या आधी नारायण हरी आपटे यांच्याच ‘भाग्यश्री’ कादंबरीवर प्रभातने ‘अमृतमंथन’ (१९३४) चित्रपटाची निर्मिती केली. सुविद्य नटी नलिनी तर्खडने यात राणी मोहिनीची भूमिका केली. चित्रपटाच्या शेवटी तत्त्वासाठी अंध झालेला राजगुरू देवीसमोर स्वहस्ते आपले शिर कापून अर्पण करतो असा क्लायमॅक्स आहे. हिंदीमध्ये राजगुरूची ही आव्हानात्मक अवघड भूमिका भेदक आणि पाणीदार डोळ्याच्या चंद्रमोहनने केली होती. सुमित्राच्या भूमिकेतील शांता आपटेची गाणी संपूर्ण हिंदुस्थानात लोकप्रिय झाली होती.
‘अमृतमंथन’च्या दिग्दर्शनासाठी व्ही. शांताराम यांना, तर उत्कृष्ट अभिनयासाठी चंद्रमोहन यांना गोहर सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. ‘अमृतमंथन’ची हिंदी आवृत्ती कृष्णमध्ये एकोणतीस आठवडे चालली. त्या काळी चित्रपटांचे रौप्य महोत्सव इतक्या सहजासहजी होत नसत.
आपट्यांच्या लघुकथांवरून काही चित्रपट बनले आहेत. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते.
सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा,
भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि “निर्भयतेने जीवन जगा” असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली.
१९६२ सालच्या सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ना.ह. आपटे हे स्वागताध्यक्ष होते.
१८८९: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर , १९७१ – कोरेगाव, जिल्हा सातारा)
- घटना :
१६५९: अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरून निघून प्रतापगड येथे पोचले.
१८०१: फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने पॉन धूमकेतूचा शोध लावला.
१८९३: कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.
१९०८: लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.
१९१९: नीदरलैंड मध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी कायदा लागू झाला.
१९३०: ऑस्ट्रेलिया चेसर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.
१९७९: अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.
• मृत्यू :
• १९९४: परमवीर चक्र सन्मानीत बॉम्बे सॅपर्सचे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचे निधन. (जन्म:२६ जून, १९१८)
• २००३: कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक सुहास शिरवळकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर, १९४८)
- जन्म :
१८९१: प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे१९६१)
१९२१: दलित साहित्यिक शंकरराव खरात यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल, २००१)
१९३१ : ज्योतिषशास्त्र, अंक ज्योतिष, हस्तरेषा यामध्ये हातखंडा असणारे बेजन दारूवाला यांचा जन्म ( मृत्यू : २९ मे, २०२० )
१९५३: माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म.
२०२१ : क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन ( जन्म : ११ ऑगस्ट , १९५४)
१९५६: पद्मश्री , ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय-अमेरिकन लेखक आणि शैक्षणिक अमिताव घोष यांचा जन्म.
१९६७: इंटरप्रेटर ऑफ़ मैलडीज़’ साठी पुलित्झर पुरस्कार- २००० सन्मानित भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक झुम्पा लाहिरी यांचा जन्म.