आज बलराम जयंती

आज शुक्रवार, ऑगस्ट २९, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ७, शके १९४७
सूर्योदय : ०६:२३
सूर्यास्त : १८:५६
चंद्रोदय : ११:१८
चंद्रास्त : २२:३७
शक सम्वत : १९४७ विश्वावसु
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – २०:२१ पर्यंत
नक्षत्र : स्वाती – ११:३८ पर्यंत
योग : ब्रह्म – १४:१३ पर्यंत
करण : कौलव – ०७:०८ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २०:२१ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : ११:०५ ते १२:३९
गुलिक काल : ०७:५७ ते ०९:३१
यमगण्ड : १५:४७ ते १७:२१
अभिजित मुहूर्त : १२:१४ ते १३:०४
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४४
दुर्मुहूर्त : १३:०४ ते १३:५४
अमृत काल : ०४:४४, ऑगस्ट ३० ते ०६:३१, ऑगस्ट ३०
वर्ज्य : १७:५६ ते १९:४४
हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याला खास महत्व आहे. आज या पवित्र महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी किंवा लाली छठ आणि बलराम जयंतीचा पवित्र सण म्हणून साजरा केला जातो. षष्ठीचे व्रत मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या सुखासाठी व सौभाग्यासाठी ठेवले जाते आणि याचे एक विशेष महत्व देखील आहे. ही पवित्र तिथी बलरामाची जयंती म्हणून देखील ओळखली जाते. ज्यांना भगवान शेषनागाचा अवतार मानले जाते.
धार्मिक ग्रंथांमध्ये बलरामजींचे नाव हलधर म्हणूनही आहे. या पवित्र तिथीला हल षष्ठी असे म्हणतात. या दिवशी असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने एखाद्या व्यक्तीच्या मुलाला दीर्घायुष्य मिळते आणि आनंदी जीवन मिळून त्याच्या सर्व इच्छा आणि अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होते. यामुळे या दिवशी हे खास व्रत ठेवले जाते.
आज बलराम जयंती आहे .
आज आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन / भारतीय क्रीडा दिन / तेलगु भाषा दिन आहे.
विदर्भाच्या सामाजिक राजकीय वांग्मय आणि संस्कृत जीवनातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी आणि त्यांच्या घराण्याचे मूळ नाव वणी.
त्यांचे आजोबा हे वैदिकी होते. त्यांचे लहानपणापासून संस्कार बापूजींवर झाले. नागपूरच्या मॉरिस कॉलेजातून १९०२ मध्ये ते बीए झाले त्यानंतर एल. एल .बी पदवी १९०७ त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून मिळवल्यानंतर विदर्भातील यवतमाळ येथे वकिलीचा व्यवसाय करू लागले. स्वातंत्र्य चळवळीतील वातावरणाने भारावून लोकमान्य टिळक यांना गुरु मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
टिळकांच्या राजकीय चळवळीत त्यांना मानाचे असे अग्रस्थान होते. त्यावेळेला विदर्भाचा लोकनायक असे त्यांना संबोधण्यात येऊ लागले. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या चळवळीत त्यांचा मनःपूर्वक सहभाग होता. पण पुढे काँग्रेसमध्ये त्यांचेशी न पटल्याने या चळवळीपासून अलिप्त झाले. इंग्रज राजवटीत व्हाइसरॉयच्या सल्लागार मंडळाचे सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. सिलोन मध्ये भारताच्या हायकमिशनर आणि स्वतंत्र भारतात बिहारचे राज्यपाल ही दोन मानाची पदे त्यांनी भूषविली. लोक नायक अणे या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू ज्ञानोपासकाची आहे. लोक जागृती करणारे लेख लोकमत आणि यवतमाळच्या हरिकिशोर साप्ताहिकातून त्यांनी केले याचा त्यांचा व्यासंग अतिशय सखोल होता.
तत्त्वज्ञान, इतिहास, धर्म आणि साहित्य हे त्यांचे वैचारिक चिंतनाचे विषय होते. या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. ‘लोक नायक अणे यांचे लेख व भाषण ‘ , ‘अक्षर माधव’ यांचा लेख संग्रह तसेच त्यांच्या लेखातून आणि प्रस्तावनेतून लोकमान्य टिळकांच्या व्यासंगाचा आणि विश्लेषक बुद्धीचा प्रत्यय येतो. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित त्रिखंडात्मक श्लोकबद्ध संस्कृत काव्य “श्रीतिलकयशोर्णव” ह्या त्यांच्या काव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. १९२८ मध्ये ग्वाल्हेर येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या तेराव्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला.
संपूर्ण आयुष्यात त्यांनी देशहिताच्या कार्यासाठी वेचले .त्यामुळे भारत सरकारकडून पद्मभूषण हा किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले.
१८८०: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९६८)
ध्यानचंद सिंग हे भारतीय हॉकी चे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हॉकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला १९२८ , १९३२ आणि १९३६ मध्ये भरलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला.
त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता कि भारताने १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी ७ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८-१ ने नामावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती जी त्यांनी नाकारली. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत.
भारत सरकारने १९५६ साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. त्यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणुन साजरा केला जातो.
१९०५: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९)
- घटना :
७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख: १० ऑगस्ट ७०८)
१४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.
१८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
१८३३: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
१८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
१९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
१९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
• मृत्यू :
• १९०६: मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक बाबा पद्मनजी मुळे यांचे निधन.
• १९६९: लोकशाहीर मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९१६)
• १९७६: इस्लाम क्रांतिकारक बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचे निधन. (जन्म: २ ४ मे १८९९)
• १९८६: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचे निधन. (जन्म: १५ जून१८९८)
• २००७: स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७)
• २००८: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)
- जन्म :
१८८७: भारतीय डॉक्टर आणि राजकारणी जीवराज नारायण मेहता यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९७८)
१९०१: सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १९८०)
१९२३: भारतीय क्रिकेट खेळाडू हिरालाल गायकवाड यांचा जन्म.