मन चंगा, तो कठौती में गंगा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, फेब्रुवारी १, २०२६ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ १२, शके १९४७
सूर्योदय : ०७:१३ सूर्यास्त : १८:३२
चंद्रोदय : १८:०३ चंद्रास्त : चंद्रास्त नहीं
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पौर्णिमा – ०३:३८, फेब्रुवारी ०२ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – २३:५८ पर्यंत
योग : प्रीति – १०:१९ पर्यंत
करण : विष्टि – १६:४२ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०३:३८, फेब्रुवारी ०२ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : १७:०७ ते १८:३२
गुलिक काल : १५:४२ ते १७:०७
यमगण्ड : १२:५२ ते १४:१७
अभिजित मुहूर्त : १२:३० ते १३:१५
दुर्मुहूर्त : १७:०१ ते १७:४६
अमृत काल : १७:५९ ते १९:२९
वर्ज्य : ०९:०२ ते १०:३१

– “मन चंगा तो कठौती में गंगा”
म्हणजेच, जर आपले मन शुद्ध असेल तर देव आपल्या अंत: करणात वास करतो.
संत रोहिदास
अब कैसे छूटे राम रट लागी।प्रभु जी, तुम चंदन हम पानी, जाकी अँग-अँग बास समानी॥प्रभु जी, तुम घन बन हम मोरा, जैसे चितवत चंद चकोरा॥प्रभु जी, तुम दीपक हम बाती, जाकी जोति बरै दिन राती॥प्रभु जी, तुम मोती, हम धागा जैसे सोनहिं मिलत सोहागा॥प्रभु जी, तुम स्वामी हम दासा, ऐसी भक्ति करै ‘रैदासा’॥

आज संत रोहिदास जयंती आहे.

भारतीय तटरक्षक दलाची स्थापना १८ ऑगस्ट १९७८ करण्यात आली. किनारपट्टीपासून १२ सागरी मैलापर्यंतची सागरी सुरक्षा भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात असते.

आज कोस्टगार्ड दिवस आहे.

भारतीय अवकाश भरारीच्या स्वप्नांना ‘गरुडझेप’ मिळवून देणारी नायिका म्हणजे कल्पना चावला. – डिसेंबर १९९४ मध्ये कल्पनाची निवड नासामध्ये अंतराळवीर म्हणून झाली. अंतराळवीरांच्या १५ व्या गटात तिने स्थान मिळविले. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर आणि परीक्षेनंतर चावला तांत्रिक बाबींवर काम करणाऱ्या ॲस्ट्रॉनॉट ऑफिस, एव्हा (EVA, एक्स्ट्रा व्हेईक्युलरॲक्टिव्हिटी), रोबॉटिक्स अँड कॉम्प्युटर ब्रँच या कार्यालयात रुजू झाली. तिच्या कामात रोबॉटिक उपकरणांचा विकास आणि अंतराळ यानाला नियंत्रित करणाऱ्या सॉफ्टवेअरची शटल एव्हिऑनिक्स या प्रयोगशाळेत चाचणी घेणे समाविष्ट होते. १९९६ साली तिची निवड STS-८७ अवकाशाला यानावर मोहीम विशेषज्ञ आणि प्रमुख रोबॉटिक हस्तचालक म्हणून करण्यात आली.

कल्पनाने आपले पहिले अंतराळ उड्डाण STS-८७ कोलंबिया या अवकाशयानमधून १९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर १९९७ एवढ्या कालावधीकरिता केले. या मोहिमेत अंतराळामध्ये भारहिनता कोणत्या प्रकारे भौतिक क्रियांना प्रभावित करते. याविषयीच्या तसेच सूर्याच्या बाह्य वातावरणीय प्रतलांचे निरीक्षण यावर भर दिलेला होता. सदस्यांपैकी दोन जणांनी एव्हाची (अवकाशात चालण्याची) कृती केली होती, त्यात चावलांचा समावेश होता. ही मोहीम अवकाशात ३७६ तास आणि ३४ मिनिटे राहिली तर अवकाशयानाने पृथ्वीभोवती २५२ वेळा परिभ्रमण केले.

कल्पना चावलाचे दुसरे व अंतिम उड्डाण १६ जानेवारी ते १फेब्रुवारी २००३, या १६ दिवसांच्या कालावधीतले. ही मोहीम विज्ञान आणि संशोधनाला समर्पित होती. विविध पाळ्यांत काम करून मोहिमेतील सदस्य दिवसातील २४ तास काम करीत होते व त्यांनी त्यात जवळजवळ ८० यशस्वी परीक्षणे केली.
मात्र या मोहिमेचा अंत दु:खद झाला. १ फेब्रुवारी २००३ ला कोलंबिया अवकाश यान परतीच्या मार्गावर असताना जमिनीवर उतरण्याच्या १६ मिनिटेआधी अवकाशयानात बिघाड झाल्यामुळे पेटले व दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात कल्पनासहित सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्पना चावला दोन्ही मोहिमांत एकूण ३० दिवस १४ तास ५४ मिनिटे अंतराळात होती.

कल्पना चावला हिला मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ हॉनर, द नासा स्पेस फ्लाईट मेडल आणि नासा डिस्टिंगविशड सर्व्हिस मेडल या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हरयाणा शासनाने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुरुक्षेत्र येथे कल्पना चावला स्मारक तारामंडळ उभारले आहे. भारताचे नाव विश्वात गाजवणाऱ्या या रणरागिणीला आजच्या स्मृती दिनी विनम्र अभिवादन.

२००३: अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी. ( जन्म : १७ मार्च , १९६२ )

जयंत साळगावकर “ ज्योतिर्भास्कर” – लेखक व उद्योजक `कालनिर्णय’ दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले जयंत साळगावकर यांचा जन्मदिन.

वेदविद्यांचा गाढा व्यासंग असलेले, हिंदू धर्मकर्माचे आधुनिक शास्त्रीय दृष्टिकोनातून तर्कसंगत विश्लेषण करणारे दार्शनिक, संकेश्वर पीठाचे ज्योतिर्विद्येतील तज्ज्ञ शंकराचार्य अभिनव विद्याभारती यांनी स्वत : परीक्षा घेऊन जयंत साळगावकर यांना ‘ज्योतिर्भास्कर’ ही उपाधी बहाल केली होती.

पण जयंत साळगावकर यांची “कालनिर्णयकार” ही मुख्य ओळख ठरली. ‘कालनिर्णय’च्या आगमनानंतर कॅलेंडर हा प्रकार जवळपास इतिहासजमा झाला. ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ ही कालनिर्णयच्या जाहिरातीतील ओळ म्हणजे जणू काही वेदवाक्य मानून फक्त मराठीत नव्हे तर हिंदुस्थानातील बहुसंख्य भाषांतील नागरिक ‘कालनिर्णय’ विकत घेऊन भिंतीवर मिरवू लागले.

कालनिर्णय दिनदर्शिकेच्या माध्यमा-तून त्यांचे विचार घराघरांत पोहचले. जयंत साळगावकर हे कालनिर्णय या दिनदर्शिकेचे संस्थापक-संपादक होते. जयंत साळगावकरांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.

मॅट्रिकपर्यंत संस्कृतचे परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय’ ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका म्हणून ख्याती मिळविली.कालनिर्णय’ आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड म्हणूनही प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळाले.

एकटय़ा मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा खप ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे. कालनिर्णयच्या खपाचा विक्रम प्रस्थापित करून त्यांनी आपल्यातील कल्पक उद्योजकाचे कौशल्य सिद्ध केले. एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. साळगावकर हे महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार होते.

जयंत साळगावकर यांनी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राविषयी विपुल लेखन करुन लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत असत.

ते मुंबईतील प्रसिध्द श्री सिद्धिविनायक मंदिराचे माजी ट्रस्टी व आयुर्विद्यावर्धिनी या आयुर्वेदिक संशोधन करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष राहिले होते. मुंबई मराठी साहित्य संघ व इतिहास संशोधन मंडळ या संस्थांचे ते अध्यक्ष होते.

१९८३ साली झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. तसेच मुंबई येथे झालेल्या ७४ व्या नाटय़संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. `सुंदरमठ, देवा तूचि गणेशु’ ही पुस्तके व धर्म-शास्त्रीय निर्णय या ग्रंथाचे संपादन व लेखन त्यांनी केले.

• १९२९: ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक जयंत साळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)

  • घटना :

१६८९: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.
१८३५: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत.
१८८४: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
१८९३: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.
१९४१: डॉ. के. बी. लेले यांनी गुरुकिल्ली हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.
१९४६: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.
१९५६: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
१९७९: १५वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.
१९८१: ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.
१९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अॅंडरसन याला फरारी घोषित केले.
२००४: मक्का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.
२०१३: जागतिक बुरखा/हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.

• मृत्यू :

• १९९५: नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर यांचे निधन. (मृत्यू: १० एप्रिल १९०७)
• २०१२: संगीतकार व संगीत संयोजक अनिल मोहिले यांचे निधन.

  • जन्म :

१८८४: महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८४)
१९१२: संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार राजा बढे यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९७७)
१९१७: चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२)
१९२७: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी२०१५ – सांगली)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »