पेशवेपदासाठीचा संग्राम

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रविवार, डिसेंबर ८, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण १७, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०० सूर्यास्त : १८:०१
चंद्रोदय : १२:३८ चंद्रास्त : ००:४१, डिसेंबर ०९
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि :सप्तमी – ०९:४४ पर्यंत
नक्षत्र : शतभिषज – १६:०३ पर्यंत
योग : वज्र – ०३:५४, डिसेंबर ०९ पर्यंत
करण : वणिज – ०९:४४ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २०:५५ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : कुंभ
राहुकाल : १६:३८ ते १८:०१
गुलिक काल : १५:१६ ते १६:३८
यमगण्ड : १२:३१ ते १३:५३
अभिजितमुहूर्त : १२:०९ ते १२:५३
दुर्मुहूर्त : १६:३३ ते १७:१७
अमृत काल : ०९:०५ ते १०:३८
वर्ज्य : २२:०९ ते २३:४०

’नानासाहेब पेशवा’ – दुसरे बाजीराव यांची सत्ता संपुष्टात आली. त्यांचे राज्य इंग्रजांनी बळकावले. पेशवे मांडलिक बनले व बिठूर येथे जाऊन राज्य करू लागले.पुढे काही काळानंतर त्यांनी झाशीच्या राणीच्या मदतीने बिठूर स्वंतत्र घोषित केले. अल्पशा आजाराने बाजीरावांचे निधन झाले व त्यांचे दत्तक पुत्र धोंडोपंत ऊर्फ नानासाहेब पेशवे झाले.

पेशवेपदासाठीचा संग्राम :

नानासाहेब दत्तक पुत्र असल्याने ईस्ट इंन्डिया कंपनीने त्यांचा स्वीकार केला नाही. बिठूर जरी स्वंतत्र असले तरी जो पर्यत ईस्ट इन्डिया कंपनीची परवानगी मिळत नाही तो पर्यत हिंदुस्थानातल्या कुठल्याही राजाला राजा म्हणून मान्यता मिळत नसे. तोच विरोध नानासाहेबांना झाला. पेशवेपद मिळविण्यासाठी त्यांना इंग्रज सेनापती मेन्सन ह्याच्याशी युद्ध करावे लागले. ह्या युद्धात नानासाहेबांचा पराजय झाला.

बिठूरचे विलिनीकरण :
नानासाहेब बिठूरचा क्रांतिदलात सक्रिय सहभाग होता. पण इंग्रजांच्या सैन्यानेही बंड मोडायचा निश्चय केला होता. त्यांनी बिठूरवर अचानक हल्ला करून नानासाहेबांना झुकायला भाग पाडले. स्वतःचा जीव वाचावा म्हणून नानासाहेबांनी बिठूर फिरंगी सत्तेत विलीन केले ते कायमचेच.

१७२१ : बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’ यांचा जन्म (मृत्यू: २३ जून १७६१)

सीडीएस जनरल बिपीन रावत – वडील लष्करामध्ये असल्याने बिपिन रावत यांचं बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेलं. जनरल रावत यांचं शिक्षण हिमाचल प्रदेशातील शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूल आणि डेहराडूनच्या कॅम्बेरियन हॉल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आपल्या जन्मस्थळी म्हणजेच डेहराडूनला गेले. तेथे त्यांना ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ हे पहिलं सन्मानपत्र मिळालं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली.

अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर बिपिन रावत यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. जनरल रावत डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (वेलिंग्टन, तामिळनाडू) आणि कमांड अँड जनरल स्टाफ कोर्स फोर्ट लीव्हनवर्थचे (अमेरिका) पदवीधर होते जनरल रावत यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी नेतृत्वावर अनेक लेख लिहिले आहेत. तसंच व्यवस्थापन आणि संगणक अभ्यासात त्यांनी डिप्लोमा केला होता. मेरठ येथील चौधरी चरणसिंग विद्यापीठाने मिलिट्री मीडिया स्ट्रॅटेजिक अभ्यासातील संशोधनासाठी त्यांना डॉक्टर ऑफ फिलोसॉफी पदवीने सन्मानित केले गेले होते.

१६ डिसेंबर १९७८ रोजी बिपिन यांचं लष्करात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. वडिलांच्याच म्हणजे, ११ गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमधून कारकीर्द सुरू केली. जनरल रावत यांनी ब्रिगेड कमांडर, जनरल ऑफिसर कमांडिंग चीफ, दक्षिणी कमांड, मिलिट्री ऑपरेशन्स डायरेक्टोरेटमध्ये जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड अशा महत्त्वाच्या पदांवर काम केलं. चार दशकांच्या कारकीर्दीत विविध आघाड्यांवर कामगिरी बजावली. 2016 मध्ये लष्कराच्या दक्षिण विभागाची जबाबदारी होती आणि काही महिन्यांत म्हणजे ३१ डिसेंबर २०१६ रोजी ते लष्करप्रमुख झाले.

सैन्यात असताना त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या होत्या. देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी ते एक होते. लष्कर प्रमुख पदावरून ३१ डिसेंबर २०१९ ला निवृत्त झाल्यानंतर ते पहिले सीडीएस म्हणजे Chief of Defence Staff या पदावर नियुक्त झाले. म्हणजेच ते भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख होते. सीडीएस हे पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचे काम करतात.

भारतीय लष्कराने २९ डिसेंबर २०१६ रोजी पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत अनेक दहशतवादी स्थळे उद्धवस्त केली होती. विशेष बाब म्हणजे बिपीन रावत यांची लष्कराच्या प्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर केवळ एका महिन्याच्या आतच सर्जिकल स्ट्राईक केला होता. हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले होते. तर जून २०१५ मध्ये मणिपूरमध्ये झालेल्या हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर २१ पॅरा कंमांडोंनी सीमा ओलांडून म्यानमारमध्ये NSCN- या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले. याचेही नेतृत्व कमांडर रावत यांनी केले होते.

त्यांच्या व्यक्तिमत्वामध्येच प्रचंड धाडस आणि देशप्रेम होतं.

२०२१ : सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात निधन ( जन्म : १६ मार्च, १९५८ )

  • घटना :
    १७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.
    १९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
    १९४१: दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.
    १९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.
    १९७१: भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.
    १९८५: सार्क परिषदेची स्थापना.
    २००४: रवींद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रतिकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.
    २००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.
    २०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.
    २०१९ : दिल्लीच्या धान्य बाजार परिसरात लागलेल्या भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी बहुतेक कामगार या इमारतीत असलेल्या छोट्या कारखान्यात काम करणारे मजूर होते. यांतील बहुतेक कामगार बिहार आणि उत्तर प्रदेशमधील होते. काहीजण शाळेच्या पिशव्या बनवत असत.

• मृत्यू :
२००४: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.

  • जन्म :
    १८७७: नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९५५)
    १८९७: हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)
    १९००: जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिगदर्शक पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित उदय शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७)
    १९३५: चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म.
    १९४२: भारतीय क्रिकेटपटू हेमंत कानिटकर यांचा जन्म.
    १९४४: चित्रपट अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »