परिवार एकता दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, डिसेंबर ३१, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १०, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१२ सूर्यास्त : १८:१२
चंद्रोदय : ०७:३३ चंद्रास्त : १८:३६
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : प्रतिपदा – ०३:२१, जानेवारी ०१ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाषाढा – ००:०३, जानेवारी ०१ पर्यंत
योग : ध्रुव – १८:५९ पर्यंत
करण : किंस्तुघ्न – १५:४२ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०३:२१, जानेवारी ०१ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : धनु – ०६:०१, जानेवारी ०१ पर्यंत
राहुकाल : १५:२७ ते १६:४९
गुलिक काल : १२:४२ ते १४:०४
यमगण्ड : ०९:५७ ते ११:१९
अभिजितमुहूर्त : १२:२० ते १३:०४
दुर्मुहूर्त : ०९:२४ ते १०:०८
दुर्मुहूर्त : २३:२४ ते ००:१६, जानेवारी ०१
अमृत काल : १९:१४ ते २०:५१
वर्ज्य : ०९:३६ ते ११:१२

आज परिवार एकता दिन आहे.

भारतीय लेखक श्री लाल शुक्ला – भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध हिंदी साहित्यिक. कथा, व्यंगकथा, कादंबरी, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारात श्रीलाल यांनी लेखन केले आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्यातील अजरौली गावी त्यांचा जन्म झाला. परिस्थिती गरीबीची. त्यांचे आजोबा संस्कृत, उर्दू आणि फारसी भाषेचे विद्वान होते आणि जवळच्याच शाळेत शिक्षक होते, पण नोकरी सोडून त्यांनी शेती करायला सुरुवात केली. त्यांच्या वडिलांना संगीताची खूप आवड होती; पण आजोबांमुळे ते त्यांच्याबरोबर शेती करू लागले. श्रीलालजी प्रयागमध्ये बी.ए. करीत होते, तेव्हा वडिलांचे निधन झाले. मग ते लखनौला आले आणि १९४८ मध्ये एम्.ए.ची परीक्षा दिल्यावर पुढे वकिली शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पण ती सोडून १९४९ मध्ये पत्नीच्या प्रेरणेने ते नागरी सेवेत दाखल झाले.

लहानपणापासनूच त्यांना वाचनाची आवड होती. इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि संस्कृत भाषेचे ते विद्वान होते. शास्त्रीय आणि सुगम संगीताचीही त्यांना आवड होती. स्वभाव विनोदी पण शिस्तप्रिय होता.कथा,कादंबरी,व्यंगकथा,समीक्षा इ. विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे.त्यांचे पुढील साहित्य प्रकाशित झाले आहे.कादंबरी – सूनी घाटी का सूरज (१९५७), अज्ञातवास (१९६२), राग दरबारी (१९६८), आदमी का ज़हर (१९७२), सीमाएँ टूटती हैं (१९७३), मकान (१९७६), पहला पड़ाव (१९७८), विश्रामपूर का संत (१९६८), बब्बर सिंह और उसके साथी (१९९९) ; कथासंग्रह – यह घर मेरा नहीं (१९७९),सुरक्षा तथा अन्य कहानियाँ (१९९१), उमरावनगर में कुछ दिन (१९९३), इस उम्र में (२००३), दस प्रतिनिधि कहानियां (२००३) ; विनोदी लेखन – अंगद का पांव (१९५८), यहां से वहां (१९७०), मेरी श्रेष्ठ व्यंग्य रचनाएँ (१९७९), कुछ ज़मीन पर कुछ हवा में (१९९०), आओ बैठ लें कुछ देर (१९९५), अगली शताब्दी का शहर (१९९६),जहालत के पचास साल (२००३) खबरों की जुगाली (२००५).याशिवाय त्यांचे निबंध,समीक्षात्मक लेखन आणि बालसाहित्यही प्रकाशित झाले आहे.

राग दरबारी ही श्रीलाल शुक्ला यांची उपहासात्मक कादंबरी श्रेष्ठ कादंबरी आहे. एका मोठ्या शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शिवपालगंज या एका खेड्याच्या जीवनाशी संबंध असलेल्या या कादंबरीने हिंदी साहित्य जगतात खळबळ माजवली.स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय समाजातील, ढासळणाऱ्या मूल्यांवर त्यांनी यात भाष्य केले आहे.शुक्ल यांची राग दरबारी ही एक प्रभावी रचना आहे. किंबहुना श्रीलाल शुक्ला यांनी स्वातंत्र्योत्तर हिंदी उपहासात्मक कादंबऱ्यांच्या परंपरेचा बदल आपल्या राग दरबारी मध्ये सादर केला आहे. स्वातंत्र्यानंतर भारताच्या राजकीय व्यवस्थेचे असे तीक्ष्ण आणि व्यंग्यात्मक सादरीकरण प्रथमच झाले आहे.विश्रामपूर का संत ही समकालीन जीवनाची महागाथा आहे.एकीकडे भूदान आंदोलनाची पार्श्वभूमी असलेल्या या कादंबरीत स्वातंत्र्योत्तर भारताच्या सत्तेच्या राजकारणाचे दर्शन घडते.

श्रीलाल शुक्ल रूढीवाद,अध्यात्मवाद आणि प्रेम या साहित्यातील समकालीन चिंता नाकारतात. त्यांच्या मते,एखाद्या लेखकासाठी त्याचा देश,कालावधी आणि एकंदरीत पर्यावरण हे साहित्याचे मुख्य प्रेरणा आणि प्रश्न असायला हवे.त्यांच्या साहित्यात व्यंग्य हे एक निवेदन वा आशय तंत्राऐवजी साहित्याचे एक शक्तिशाली माध्यम म्हणून प्रकटते.त्यांच्या कादंबऱ्या,कथा, निबंध यामध्ये उपहासात्मकता आढळते. त्यांनी भारतीय लोकशाहीच्या अपयशाची आणि लोकशाहीच्या बाजूने होणार्या हिंसाचाराचा निषेध केला आहे.साहित्यिक भूमिकेत ते भारतीय सत्तेचा विरोध दर्शवितात.

श्रीलाल शुक्ल यांच्या कादंबऱ्यांचे इंग्रजी आणि अन्य अनेक भारतीय भाषात अनुवाद झाले आहेत.अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

१९२५: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर, २०११)

स्वरमहर्षी – सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील भाडळे या गावी १० मार्च, इ.स. १९१८ रोजी, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी झाला. जन्मतःच त्यांना एक दात होता. खेडेगावात ही गोष्ट खूप अशुभ मानली गेली. त्यावेळी सौदागरांच्या मामाने त्यावेळच्या कुर्तकोटी शंकराचार्यांना याबाबत विचारले. शंकराचार्यांनी सांगितले की हा मुलगा मोठेपणी खूप नाव कमावणार आहे. सौदागरांना गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी मिळाली होती.

सौदागर आणि धाकटा भाऊ पितांबर यांना घेऊन दामूअण्णा पुण्याला आले. आणि सौदागरांचे संगीत शिक्षण सुरू झाले. त्यांना नाट्यगीते शिकवण्यासाठी बळवंत गोवित्रीकर यांना बोलावण्यात आले. दत्तूबुवा बागलकोटकर यांनी त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. यानंतर नरहरबुवा पाटणकर, गणेशबुवा पाध्ये यांनीही सौदागरांना गायनाचे शिक्षण दिले. टप्पा आणि ठुमरीचेही शिक्षण दिले.

छोट्या गंधर्वांना १९५० साली अभिजात संगीत नाटकांमधून कृष्णाची भूमिका करण्याची संधी मिळाली. या भूमिकेने इतिहास घडविला. त्यानंतर मानापमानमधे धैर्यधर या पहिल्या अंकातील शूर वीर आणि नंतरचा प्रेमात पडलेला धैर्यधर या भूमिका छोटा गंधर्व इतक्या सुंदर करायचे की प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घ्यायचेच बाकी ठेवले होते.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुणरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत.

इआवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणार्या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला.
१९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला.

वयाची पासष्ठी उलटलेल्या या स्वरमहर्षीला १९८४ मध्ये, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असलेल्या शिवप्रसाद या त्यांच्या एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनाचा धक्का बसला. तरीही संगीताच्या साथीने पुढची पिढी घडवण्याचा सौदागरांचा दिनक्रम सुरू राहिला.
संगीतावरील जुन्या ग्रंथांचे वाचन, ज्योतिष तसेच आध्यात्म्याचा अभ्यास व क्रिकेटसारख्या छंदांसोबत ते ‘दुसरे बालपण’ जगत होते.

१९९७: स्वरराज छोटा गंधर्व यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९१८)

  • घटना :
    १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.
    १८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
    १८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
    १९४४: दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
    १९५५: जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.
    १९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.
    १९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
    १९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
    २००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ – १०१ या इमारतीचे उद्घाटन झाले.

• मृत्यू :

• १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन. (जन्म: १२ जुलै, १८६३)
• १९८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन. ( जन्म: १५ मार्च , १९१७ )
• २०१८ : ज्येष्ठ अभिनेते, सकस पटकथाकार कादर खान यांचे निधन (जन्म : १८ डिसेंबर, १९३७)

  • जन्म :

१८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे , १९५४)
१९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर, १९९२)
१९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर, २०११)
१९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »