विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, जानेवारी १, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष ११, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१२ सूर्यास्त : १८:१२
चंद्रोदय : ०८:२६ चंद्रास्त१९:३८
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – ०२:२४, जानेवारी ०२ पर्यंत
नक्षत्र : उत्तराषाढा – २३:४६ पर्यंत
योग : व्याघात – १७:०७ पर्यंत
करण : बालव – १४:५५ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०२:२४, जानेवारी ०२ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : मकर
राहुकाल : १२:४२ ते १४:०५
गुलिक काल : ११:२० ते १२:४२
यमगण्ड : ०८:३४ ते ०९:५७
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:२० ते १३:०४
अमृत काल : १७:२७ ते १९:०१
वर्ज्य : ०७:५८ ते ०९:३२
वर्ज्य : ०३:४०, जानेवारी ०२ ते ०५:१४, जानेवारी ०२

“नरसोबावाडी जे लोकमान्या । कृष्णातीरी शोभवी जे धन्या ॥
अन्या तैसी देखीली म्या न साची । श्री दत्ताची राजधानी सुखाची ॥”

श्री नृसिंह सरस्वतींनी या ठिकाणी बारा वर्षे तपश्चर्या केली. या ठिकाणी त्यांनी अनेक लीला केल्या. म्हणूनच त्यांच्या नावावरून या स्थानाला ‘नृसिंहवाडी’ किंवा ‘नरसोबावाडी’ असे नाव पडले. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणजे दत्तभक्तांचे हृदयच! हे तीर्थक्षेत्र म्हणजे भूत, प्रेत, पिशाच्चांचे कर्दनकाळच ठरलेले आहे. लाखो भक्तांनी इथे प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नयन करून घेतले आहे.

श्रीनृसिंह सरस्वती हे श्रीदत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्धी पावले.

आज नृसिंह सरस्वती यांची जयंती आहे .

ग्रेगोरियन कॅलेंडरचा वर्षारंभ दिवस.

आज आर्मी मेडिकल कोअर स्थापना दिन आहे.

बाळाजी विश्वनाथ भट – भट घराण्यातील पहिला पेशवा होत.

ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वत:च्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे बाळाजींनी परत जोडली. जर शाहूंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजू शकतील हे आंग्र्यांना बाळाजीनेच पटवून त्यांना शाहूंच्या पक्षात आणले.
त्यांनी सय्यदबंधूंबरोबर तह घडवून आणला, मग त्यांच्याच साहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करुन रफिउद्दौरजात याला गादीवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहूंच्या पत्नींची सुटका करवून घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उद्भवू नये म्हणून बाळजीने केलेली राजकारणे भल्याभल्यांच्या मतीला गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्द सामर्थ्यावर घडवून आणले होते हे महत्वाचे.

१७०७ पासून पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला “पेशवेपद” दिले, अर्थात ते त्या योग्यतेचा होतेच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले.

१६६२: पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल , १७२०)

भारतीय शास्त्रज्ञ बोस -आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ यांचा जन्म जानेवारी १ १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते.

१९१५ सालीच सत्येंद्रनाथांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित केला. १९१६ ते १९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम कले. १९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

१९२३ साली सत्येंद्रनाथांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरित करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले.

आपल्या कामाच्या व्यापातून सत्येंद्रनाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम मेरी क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येंद्रनाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.

१९४५ साली सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली.

भौतिकशास्त्र विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.

१९५८ साली सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.
सत्येंद्रनाथांचे हृदय रोगामुळे निधन झाले.

१८९४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म. ( मृत्यू: ४ फेब्रुवारी, १९७४)

रामाश्रेय झा एक प्रतिष्ठित संगीतकार, संगीतकार, विद्वान आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षक- . १९८० ते १९८९ पर्यंत ते अलाहाबाद विद्यापीठात संगीत विभागाचे प्रमुख होते. ते त्यांच्या सखोल ज्ञान, सर्जनशील प्रतिभा आणि शिक्षक म्हणून त्यांच्या भेटवस्तूंसाठी ओळखले जात होते. त्यांचा पाच खंडांचा काव्यसंग्रह अभिनव गीतांजली हिंदुस्थानी संगीतातील सर्वात प्रभावशाली कृतींमध्ये उच्च स्थानावर आहे. यात असंख्य पारंपारिक आणि स्वयं-कल्पित रचनांनी पूरक रागांचे गंभीर विश्लेषण आहे.

झा-साहबांच्या उत्कृष्ट रचना पाहिल्या आणि त्या मांडणाऱ्यांमध्ये सर्वात पहिले म्हणजे प्रसिद्ध उस्ताद, स्वर्गीय जितेंद्र अभिषेकी , ज्यांनी रामरंगच्या अनेक रचना गायल्या आणि शिकवल्या.
१९६८ मध्ये त्यांची अलाहाबाद विद्यापीठाच्या प्राध्यापकांमध्ये नियुक्ती झाली आणि नंतर १९८० मध्ये त्यांची संगीत विभागाच्या प्रमुखपदी बढती झाली. विद्यापीठाचे हे पाऊल खऱ्या गुणवत्तेला मान्यता देण्यासाठी होते कारण रामरंग यांचेकडे कोणतीही औपचारिक महाविद्यालयीन पदवी नव्हती . 1989 मध्ये ते त्यांच्या सक्रिय प्राध्यापकीय कर्तव्यातून निवृत्त झाले.

२००५ मध्ये, रामरंगला संगीत नाटक अकादमी , भारताच्या राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाटक अकादमीकडून संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. रामरंग यांचे १ जानेवारी २००९ रोजी कोलकाता, भारत येथे हृदयशस्त्रक्रियेनंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे निधन झाले.
त्यांच्या सुप्रसिद्ध शिष्यांमध्ये विदुषी कमला बोस, शुभा मुदगल आणि स्व.डॉ. गीता बॅनर्जी यांचा समावेश आहे.

• २००९: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट, १९२८)

१९४३: शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रघुनाथ माशेलकर यांचा जन्म. श्री माशेलकर सरांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

  • घटना :
    १७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
    १८०८: अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
    १८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनन पुढे पेशव्यांच्या २५,००० सैन्याला पराभव पराभव स्विकारावा लागला.
    १८४२: बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.
    १८४८: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
    १८६२: इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.
    १८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.
    १८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.
    १९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
    १९०८: संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.
    १९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
    १९२०: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांनी छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
    १९२३: चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.
    १९३२: डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले.
    १९९५: WTO ची स्थापना झाली.
    २०००: ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
  • मृत्यू :

१९५५: कौन्सिल ऑफ सायन्टिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्च (सी.एस.आय.आर.) चे शिल्पकार –
भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन. (जन्म : २१ फेब्रुवारी , १८९४ )
• १९७५: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर, १८९१)
• १९८९: समाजवादी विचारवंत व पत्रकार दिनकर साक्रीकर यांचे निधन.

  • जन्म :

१८९२: स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट , १९४२)
१९००: आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी, १९७४)
१९०२: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर , १९७१)
१९१८: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट , २००२)
१९२८: लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९८)
१९३६: साहित्यिक राजा राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९९७)
१९४१: चित्रपट कलाकार गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म.
१९४२ : मातंग समाजाचे दुखणे मांडणारे लेखक उत्तम बंडू तुपे यांचा जन्म (मृत्यू : २६ एप्रिल ,२०२०)
१९५०: भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका दीपा मेहता यांचा जन्म.
१९५१: अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »