संत चोखा मेळा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, मे ७, २०२६ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख १७, शके १९४८
सूर्योदय : ०६:०७ सूर्यास्त : १९:०३
चंद्रोदय : ००:०१, मे ०८चंद्रास्त : १०:०९
शक : १९४८
संवत्सर : पराभव
उत्तरायण
ऋतू : वसन्त
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : पञ्चमी – १०:१३ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाषाढा – १८:४६ पर्यंत
योग : साध्य – ०२:००, मे ०८ पर्यंत
करण : तैतिल – १०:१३ पर्यंत
द्वितीय करण : गर – २३:२० पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : धनु – ०१:२६, मे ०८ पर्यंत
राहुकाल : १४:१२ ते १५:४९
गुलिक काल : ०९:२१ ते १०:५८
यमगण्ड : ०६:०७ ते ०७:४४
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : १०:२६ ते ११:१८
दुर्मुहूर्त : १५:३६ ते १६:२८
अमृत काल : १३:२३ ते १५:११
वर्ज्य : ०३:३७, मे ०८ ते ०५:२३, मे ०८

संत चोखा मेळा अभंग

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें। काय भुललासी वरलिया रंगें॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा॥४॥

अर्थ: ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा.डोंगा म्हणजे वाकडा तिकडा ऊस दिसतांना जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो. रसाची गोडी वाकडी-तिकडी नसते़. म्हणून आपण वरवरच्या रंगाला भुलू नये. फसू नये. रंग आणि आकार ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बाहेरचे आवरण.ते अगदी वरवरचे स्तर आहेत. त्यालाच आपण फशी पडलो तर गाभ्यातल्या मूळ तत्त्वाशी आपली भेट होणार नाही.आपले मीलन होणार नाही. म्हणून संत चोखा मेळा म्हणतात मी जरी वाकडा वाटले तरी माझा भाव भोळा, आहे सरळ आहे.

पंढरीचे सुख नाही त्रिभूवनी। प्रत्येक चक्रपाणी उभा असे।।

मंगळवेढ्याला गावकुसाची भिंत बांधत असताना ती कोसळली. त्यात अनेक मजूर ठार झाले. यात चोखोबांचाही समावेश होता. तो दिवस वैशाख वद्य ५ शके १२६० होय. आठ दिवसानंतर संत नामदेवांनी ढिगाऱ्याखाली असलेल्या संत चोखोबांच्या अस्थीचा शोध घेवून त्या अस्थींना पंढरपूरला महाद्वारी समाधी दिली. तो दिवस म्हणजे वैशाख वद्य त्रयोदशी होय. ‘महाद्वारापुढे मला ठाव द्यावा’ ही प्रिय भक्ताची इच्छा विठ्ठलाने नामदेवाच्या हातून पूर्ण केली. याबाबत संत जनाबाई आपल्या अभंगातून म्हणतात,
चोखामेळ्याची करणी। देव केला त्याने ऋणी।।

आज संत चोखा मेळा पुण्यतिथी आहे.

‘चाहे कितनी कठिन डगर हो, हम कदम बढाते जाएंगे।’
गीतकार प्रेम धवन ही व्यक्ती केवळ कवी, शायर नव्हती। प्रेम धवन हे व्यक्तिमत्त्व अनेक कलांमध्ये पारंगत होते. ते संगीतकार, नर्तक, नृत्य दिग्दर्शक होते. १३ जून १९२३ ही त्यांची जन्मतारीख! हरियाणामधील अंबाला गावी त्यांचा जन्म झाला. बालपणापासून त्यांना काव्याची आवड होती.
पदवीधर झाल्यानंतर ते मुंबईच्या ‘इप्टा’ या नाट्यसंस्थेत सहभागी झाले. तेथील व्यासपीठावर काव्यवाचन करताना त्यांची चित्रपट क्षेत्रातील अनेकांशी ओळख झाली. १९४६मध्ये ‘इप्टा’नेच ‘धरती के लाल’ हा चित्रपट निर्माण केला होता. त्यात प्रेम धवन यांनी लिहिलेले गीत घेण्यात आले होते. तिथूनच प्रेम धवन यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.
त्यानंतर १९४८मध्ये त्यांनी ‘जिद्दी’ या चित्रपटासाठी लिहिलेल्या ‘जादू कर गए किसी के नैना….’ या लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याने लोकप्रियता मिळवली. १९४९मध्ये ‘जीत’ चित्रपट आला. त्यामध्ये प्रेम धवननी लिहिलेले गीत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील वाटचालीबद्दल स्वतःलाच आश्वस्त करणारे होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण त्या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळीचे शब्द होते. ‘चाहे कितनी कठिन डगर हो, हम कदम बढाते जाएंगे!’
या गाण्यांनी प्रेम धवन गीतकार म्हणून प्रसिद्धीला आले. संगीतकार अनिल विश्वास यांच्याबरोबर त्यांनी सात-आठ चित्रपट केले. त्यातील अनिलदांचे संगीत कर्णमधुर होतेच; पण त्या गीतांमधील आशयसंपन्न शब्द रसिकांना भावले. १९४९ ते १९५३च्या या काळानंतर संगीतकार रवी यांच्यासाठीही प्रेम धवन यांनी गीते लिहिली. संगीतकार रवी यांचा पहिला चित्रपट ‘वचन’! त्याची गीते प्रेम धवन यांनीच लिहिली होती. त्यानंतर एक साल, चिराग कहाँ रोशनी कहाँ, नयी राहें, अपना घर प्यार का सागर, दस लाख, एक फूल दो माली, धडकन (१९७२) या चित्रपटांना रवी यांनी संगीत दिले होते व त्यांची गीते प्रेम धवन यांनी लिहिली होती.
संगीतकार रवी यांच्याप्रमाणेच संगीतकार चित्रगुप्त! या दोघांना अनेक चित्रपट समीक्षक संगीतकार मानत नाहीत; पण वास्तव तसे नव्हते. या दोन्ही संगीतकारांनी अनेक मधुर गीते दिली आहेत. या दोघांमधील समान दुवा म्हणजे या दोघांच्या अनेक चित्रपटांची गीते प्रेम धवन यांनी लिहिलेली होती. १९५९चा गेस्ट हाउस १९६०चा चाँद मेरे आजा, १९६१चा बडा आदमी व जबक, १९६२चा बेजुबान, अशा अनेक चित्रपटांना चित्रगुप्त यांचे संगीत होते व प्रेम धवनने गाणी लिहिली होती. मनोजकुमारने जेव्हा आपल्या ‘शहीद’ या चित्रपटाकरिता प्रेम धवन यांना गीत लिहिण्यास आमंत्रित केले, तेव्हा प्रेम धवन शहीद भगतसिंग यांच्या आईला भेटले. त्यांच्याशी बोलले व त्यांच्या अनुभव कथनातून जे कळले, जाणवले, त्यावरून त्यांनी ‘शहीद’ची गाणी लिहिली. पन्नासच्या दशकात ‘इप्टा’ संस्थेचे काही प्रतिनिधी रशियाला गेले होते त्यामध्ये प्रेम धवन होते. तेथे त्यांनी मातृभूमीच्या आठवणीतून एक गाणे लिहिले. ते गीत वाचून दिग्दर्शक विमल रॉय एवढे प्रभावित झाले, की त्यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाकरिता प्रेम धवन यांना गीत लिहिण्यासाठी बोलावले. तो चित्रपट होता ‘काबुलीवाला’! त्या चित्रपटातील ‘ए मेरे प्यारे वतन’ हे ते गीत, जे प्रेम धवन यांच्या अलौकिक प्रतिमेचे दर्शन घडवते.
‘जागते रहो’ हा राज कपूरचा कलात्मक चित्रपट! शैलेंद्र त्याचा आवडता गीतकार! परंतु भांगडा गीतासाठी प्रेम धवनला पाचारण केले गेले! भारतातील सद्य परिस्थिती, चित्रपटाच्या कथानकात दाखवलेले लोकांचे बाह्यरंग व अंतरंग या सर्वांचा विचार करून प्रेम धवनची लेखणी कसे वार करते बघा… ‘सच्चे फाँसी चढते देखे झूठा मौज उडाये…’ हे गाणे म्हणजे भावुक प्रेमगीते लिहिणाऱ्या प्रेम धवनच्या लेखणीचा वेगळा आविष्कार!
प्रेम धवन यांनी शहीद (१९६५), पवित्र पापी, वीर अभिमन्यू, वीर अमरसिंह राठौड (१९७०), फर्ज और खून (१९७८) याशिवाय अनेक पंजाबी चित्रपटांना संगीत दिले होते. त्यांनी पंडित रविशंकर यांच्याकडून संगीताचे ज्ञान घेतले होते, तर उदयशंकर यांच्याकडून नृत्याचे शिक्षण घेतले होते. प्रेम धवन यांनी ‘दो बीघा जमीन,’ ‘नया दौर’ आणि ‘गूँज उठी शहनाई’ या चित्रपटांकरिता नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले होते.

  • २००१: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गीतकार, प्रेम धवन यांचे निधन. (जन्म: १३ जून, १९२३ – अंबाला, पंजाब)

कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल- एक श्रेष्ठ गुजराती कांदबरीकार व कथाकार. त्यांचा जन्म राजस्थानमध्ये मांडली (जि. डुंगरपूर) या गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. आईवडील हिराबेन व नानालाल. राजस्थानात व गुजरातमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले तथापि मॅट्रिकची परीक्षा मात्र ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यांचे बालपण व पूर्वायुष्य वऱ्याच हालअपेष्टांत व विविध ठिकाणी नोकऱ्या करण्यात व्यतीत झाले. शिक्षणातही वारंवार खंड पडत होता. राजस्थान ही त्यांची जन्मभूमी असली, तरी त्यांची कर्मभूमी गुजरातच राहिली. उमाशंकर जोशी हे त्यांचे शाळेतील मित्र. त्यांच्याच प्रेरणेने व उत्तेजनाने पन्नालाल साहित्यक्षेत्रात प्रविष्ट झाले. उमाशंकरांच्या मदतीचा ते मोठ्या कृतज्ञतेने उल्लेख करतात.
सुरुवातीस त्यांनी काही कविता लिहिल्या पण नंतर ते कथा-कादंबरीलेखनाकडे वळले. उमाशंकर जोशी व ‘सुंदरम्’ यांनी त्यांच्या सुरुवातीच्या लेखानाचे कौतुक करून त्यांना उत्तेजन दिले. ‘शेठनी शारदा’ ही त्यांची पहिली कथा १९३६ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक इ. प्रकारांत विपुल लेखन केले. मळेला जीव ही त्यांची कादंबरी राजकोट येथून प्रसिद्ध होणाऱ्या फूल छाव दैनिकातून क्रमशः प्रसिद्ध झाली आणि एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून त्यांना प्रतिष्ठा लाभली. सुमारे चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबऱ्या, ५ नाटके, आठवणी, बालसाहित्य यांसारखी विपुल साहित्यनिर्मिती त्यांनी केली. जनसत्ता ह्या दैनिकातून ते एक उपरोधपर सदर लिहीत असत. १९५० मध्ये त्यांना गुजराती साहित्याचा सर्वोच्च असा रणजीतराम सुवर्णचंद्रक मिळाला. वास्तव्य अहमदाबाद येथे. गुजरात सरकारकडून आतापर्यंत त्यांच्या १७ कृतींना पुरस्कार प्राप्त झाले. गुजरातच्या ग्रामीण जीवनाचे वास्तव व प्रामाणिक चित्रण आपल्या कथा-कादंबऱ्यांतून समर्थपणे करणारे पन्नालाल पटेल हे आद्य लेखक होत. गुजराती लोकभाषेच्या सामर्थ्याची साक्ष त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून पटते. गुजराती साहित्यात त्यांनी घातलेली ही मोलाची भर म्हणावी लागेल.
१९१२: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल, १९८९)

घटना:
१८४९: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.
१९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.
१९४६: सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली.
१९५५: एअर इंडिया ची मुंबई – टोकियो विमानसेवा सुरू झाली.
१९७६: होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.
१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
१९९२: एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
१९९८: मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.
२०००: व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले.
२०००: कोची येथे झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.

  • मृत्यू :
  • १९२४: भारतीय कार्यकर्ते अलायरी सीताराम राजू यांचे निधन. (जन्म : १५ मे, १८९७)
    १९९१: लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे पुणे येथे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर, १९११)
    १९९४: ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर यांचे निधन.
  • २००२: मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या त्या मुळेच इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ त्यांच्या सरकारने देऊ केलेले पद्मश्री आणि ज्ञानपीठ पुरस्कार नाकारणाऱ्या जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी, १९१०)

जन्म :
१८६१: पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात जन्म. (मृत्यू: ७ ऑगस्ट, १९४१)
१८८०: भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९७२)
१९२३: मराठी नाट्यअभिनेते व दिग्दर्शक आत्माराम गोविंद भेंडे यांचा आरोंदा (सिंधुदुर्ग) येथे जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी, २०१५)
१९४८: मैहर घराण्याचे बासरी वादक नित्यानंद हळदीपूर यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »