राजा छत्रसाल बुंदेला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, मे ४, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख १४, शके १९४८
सूर्योदय : ०६:०९ सूर्यास्त : १९:०२
चंद्रोदय : २१:३४ चंद्रास्त : ०७:३५
शक : १९४८
संवत्सर : पराभव
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : तृतीया – ०५:२४, मे ०५ पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – ०९:५८ पर्यंत
योग : परिघ – २३:२० पर्यंत
करण : वणिज – १६:१२ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०५:२४, मे ०५ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : ०७:४६ ते ०९:२२
गुलिक काल : १४:१२ ते १५:४९
यमगण्ड : १०:५९ ते १२:३५
अभिजित मुहूर्त : १२:१० ते १३:०१
दुर्मुहूर्त : १३:०१ ते १३:५३
दुर्मुहूर्त : १५:३६ ते १६:२७
अमृत काल : ०३:०२, मे ०५ ते ०४:४९, मे ०५
वर्ज्य : १६:१५ ते १८:०३

भारतात दरवर्षी ४ मे रोजी ‘कोळसा खाण कामगार दिन’ (Coal Miners Day) साजरा केला जातो. हा दिवस कोळसा खाणीतील कामगारांचे परिश्रम, त्याग आणि देशाच्या ऊर्जा क्षेत्रात, विशेषतः वीज निर्मितीत, त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासाठी पाळला जातो.

अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या खाण कामगारांना सलाम करणे, त्यांच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा उद्देश आहे.

कोळसा हे प्रमुख इंधन असून, आपल्या घरांना आणि उद्योगांना ऊर्जा पुरवण्यामध्ये या कामगारांचा वाटा अमूल्य आहे.

भारतात कोळसा उत्खननाचा इतिहास १८ व्या शतकापासून सुरू झाला . या कामगारांच्या योगदानाची दखल घेत हा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.

खाण कामगार विषारी वायू, स्फोट, आणि खाण कोसळणे यांसारख्या धोकादायक परिस्थितीत काम करतात .

आज कोळसा खाण कामगार दिन आहे.

आज आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन आहे.

• १८४७: कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन. ( जन्म: ४ मे १७६७ )

छत्रसाल बुंदेला –
तोड़ादार घोड़ादार
वीरनि सों प्रीति करी
साहस सों जीति जंग
खेत ते न चालियौ
बिन्ती छत्रसाल करै
होय जो नरेस देश
रैहे न कलेस रेस
मेरो कह्यो पालियौ

राजा छत्रसाल बुंदेला –
खुद्द शिवरायांनी दिला स्वराज्याचा कानमंत्र, छत्रसालच्या तलवारीने फोडला होता मुघलांना घाम . . .

छत्रसाल राजाचा जन्म झांशीजवळ एका गावात ककर-कचनयमध्ये झाला. त्यांचे वडिलांचे नाव होते बुंदेला वीर चंपतराय. त्यांनी 17व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात ओरछा प्रदेशाला मुघल साम्राज्यातून स्वतंत्र करण्याचा प्रण केला होता. यासाठी त्यांनी विद्रोचा झेंडा हाती घेतला होता. परंतु चंपतराय यांना स्वकीयांविरुद्धच अनेकदा युद्ध करावे लागले. कारण स्वकीयांपैकी काही जण हे मुघलांची हुजरेगिरी करून त्यांचे बंड थोपवण्याचे प्रयत्न करत होते. 30 वर्षे संघर्षानंतर स्वकीयांपैकीच काहींनी कट करून 1661 मध्ये चंपतराय यांचा वध केला आणि मुंडके कापून औरंगजेबाकडे पाठवले. या संघर्षाच्या काळात बालक छत्रसालही आपल्या वडिलांसोबत जागोजागी भटकत राहिले. आणि त्यांच्याकडून युद्धकलेचे प्रशिक्षण घेत राहिले. आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची भावना छत्रसाल यांच्यात वाढीस लागली होती. यासाठी त्यांच्याकडे काही साधन नसल्याने ते सुसंधीची प्रतीक्षा करत होते.

वडिलांच्या हत्येचा प्रतिशोध घ्यायचा होता – – दरम्यानच्या काळात छत्रसाल मुघल सैन्यात भरती झाले. आणि सैन्यासह दख्खनच्या मोहिमेवर आले. तेथे मिर्झा राजे जयसिंग यांच्यासह सैन्यासह पुरंदरच्या वेढ्यात, आपला भाऊ अंगद तथा काका जामशहा यांच्या सोबत होते. त्या वेढ्याच्या वेळी शौर्य गाजवल्याने त्यांना पुरस्कृतही करण्यात आले. परंतु, छत्रसालच्या हृदयात आपल्या वडिलांच्या हत्येचा प्रतिशोध घेण्याची जिद्द पेटलेली होती. शिवाजी महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या संघर्षामुळे ते प्रभावित झाले. मुघल सल्तनतीला आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात जागी झाली.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रसाल यांची भेट – एका दिवशी शिकारीच्या बहाण्याने छत्रसाल मुघलांच्या कंपूतून बाहेर पळून गेले. त्यांनी भीमा नदी पार करून आपल्या पत्नीसह शिवाजी महाराजंची पुण्यात भेट घेतली. इतिहासकारांच्या मते, छत्रपती शिवाजी व छत्रसाल भेट, शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेनंतर 1667 मध्ये झाली. छत्रसाल काही काळ शिवाजी महाराजांकडे पुण्यात राहिले. तेथे त्यांनी महाराजांकडून युद्धनीती, कूटनीती आणि शासननीतीचे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी या शिक्षणाचा आपल्या मुलखात बुंदेलखंडात मोठ्या खुबीने उपयोग केला.

महाराजा छत्रसालची इच्छा होती की, दक्षिणेत राहून मुघलांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्याच्या कामी यावे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज दूरदर्शी होते. त्यांनी स्वराज्याच्या प्रयत्नाला फक्त दक्षिणेपर्यंत सीमित ठेवायचे नव्हते. म्हणून त्यांनी छत्रसालला सल्ला दिला की, तुम्ही बुंदेलखंडात परता आणि मुघलांविरुद्ध स्वातंत्र्याचा शंखनाद करा.

अन् तळपू लागली छत्रसालची तलवार – – छत्रपती शिवाजी महाराजांचा सल्ला प्राणपणाने मानून छत्रसाल बुंदेलखंडात परतले. तेथे त्यांनी फक्त 5 घोडदळातील सैनिक आणि 25 तलवारबाज यांच्यासह संघर्षाला सुरुवात केली. जवळ होती फक्त छत्रपतींनी चेतवलेले स्वराज्याचे स्फुलिंग. लवकरच ती संधी आली जेव्हा औरंगजेबाने आपल्या सैन्याला ओरछातील मंदिरे नष्ट करण्याचा आदेश दिला. या वेळी रयतेच्या दृष्टीने छत्रसालच एकमेव आशेची किरण होते. म्हणून सर्व जण छत्रसाल यांच्या नेतृत्वा संघटित झाले. यानंतर एकेक जहागीरदार अन् सरदार छत्रसाल यांना जोडत गेले अन् सर्वांनी मुघलांचा सशस्त्र प्रतिकार केला.

१६४९: बुंदेलखंड चे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १७३१)

• १८४७: कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन. ( जन्म: ४ मे १७६७ )

  • घटना :
    १७९९: श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
    १८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
    १९०४: अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.
    १९०८ : लोकमान्य टिळकांच्या अकोल्यातल्या एका सभेला श्रीगजानन महाराज उपस्थित होते, तारीख होती ४ मे १९०८, निमित्त होते शिवजयंतीच्या उत्सवाचे..!

शिवजयंतीच्या प्रीत्यर्थ भरवलेल्या सभेत लोकमान्य टिळक आणि श्री गजानन महाराज एकत्र आले. त्या सभेत महाराजांनी असे भाकीत वर्तवले की लोकमान्यांना कारावास भोगावा लागेल आणि प्रत्यक्षात खरंच लोकमान्यांना मंडालेच्या तुरूंगात जावे लागले. खटला चालू असताना श्री गजानन महाराजांनी त्यांना भाकरीचा प्रसाद पाठवला .
सज्जनांसी त्रास झाल्याविना | राज्यक्रांति होईना ||
कंसाचा तो मनी आणा | इतिहास म्हणजे कळेल||
या भाकरीच्या बळावरी | तो करील मोठी कामगिरी ||
जातो जरी फार दूरी | परी न त्याला इलाज ||

  • तेथे ‘गितारहस्य‘ हा ग्रंथ लिहिला गेला. गजानन महाराजांचे शब्द खरे ठरले.
    १९१०: रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.
    १९५९: पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.
    १९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.
    १९७९: मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
    १९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.
    १९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
    १९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.

• मृत्यू :

• १९६८: बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन. ( जन्म : ७ सप्टेंबर, १९२० )

• १९८०: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १९०५)

• २००८: तबलावादक पद्म विभूषण किशन महाराज यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर, १९२३)

  • जन्म :

१७६७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी, १८४७)
१९१९ : जागतिक ख्यातीचे शैलाश्रायाचे अध्ययन करणारे, पाषाणावर काढलेल्या चित्रांचा अभ्यास करणारे, त्यामधून भारताच्या आणि जगाच्या उत्क्रांतीचा इतिहास एकत्रित मांडणारे कलाकार, शैलाश्रायाचे अभ्यासक, चित्रकार, व्यासंगी, ज्ञानी, सतत ज्ञानाची आकांक्षा असणारे पद्मश्री डॉ विष्णु श्रीधर वाकणकर ऊर्फ ‘हरिभाऊ वाकणकर यांचा जन्म ( मृत्यू : ३ एप्रिल, १९८८)
१९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार वीरसेन आनंदराव कदम ऊर्फ बाबा कदम यांचा जन्म. (मृत्यू: २० , ऑक्टोबर, २००९)
१९३४: भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म. ( मृत्यू : ६ मे, २०१८ )
१९४२: विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार पद्मभूषण सॅम पित्रोदा यांचा जन्म.
१९४३: भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रसांत पटनाईक याचा जन्म.
१९४५: ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »