आंतरराष्ट्रीय आहारदिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बुधवार, मे ६, २०२६ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख १६, शके १९४८
सूर्योदय : ०६:०८ सूर्यास्त : १९:०३
चंद्रोदय : २३:१५ चंद्रास्त : ०९:१५
शक : १९४८
संवत्सर : पराभव
उत्तरायण
ऋतू : वसन्त
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्थी – ०७:५१ पर्यंत
नक्षत्र : मूळ – १५:५४ पर्यंत
योग : सिद्ध – ०१:१२, मे ०७ पर्यंत
करण : बालव – ०७:५१ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २१:०३ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : धनु
राहुकाल : १२:३५ ते १४:१२
गुलिक काल : १०:५८ ते १२:३५
यमगण्ड : ०७:४५ ते ०९:२२
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
अमृत काल : ०८:४२ ते १०:३०
वर्ज्य : १४:०६ ते १५:५४
वर्ज्य : ०२:३८, मे ०७ ते ०४:२६, मे ०७

आपल्या शरीराची स्वीकृती त्यात असेलेल्या चरबीची स्वीकृती आणि शरीरच्या आकारातील विविधततेची स्वीकृती ह्या उद्देशाने हा दिन साजरा करण्यात येतो. आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

आज आंतरराष्ट्रीय आहारदिन आहे.

शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (१६ फेब्रु. १८७६– ६ मे १९६६). उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणतज्ञ. जन्म मुर्डी (जि. रत्नागिरी) येथे. वडील पुरुषोत्तम केशव परांजपे (परांजप्ये) धार्मिक वृत्तीचे होते. आई गोपिकाबाई ह्या टिळक कुटुंबातील होत्या. परांजपे यांचे प्राथमिक शिक्षण अंजर्ला, मुर्डी व दापोली येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईस त्यांचे आतेभाऊ (महर्षी) धोंडो केशव कर्वे यांच्याकडे राहिले. १८९१ मध्ये मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
१८९२ साली धोंडो केशव कर्वे यांची पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाल्यावर परांजपे त्यांच्याबरोबर पुण्यास आले. १८९६ मध्ये ते पहिल्या वर्गात बी. एस्सी. उत्तीर्ण झाले. पुढे भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले. तेथील मॅथेमॅटिकल ट्रायपॉस परीक्षेत जॉर्ज बर्थव्हिसल यांच्याबरोबर सर्वप्रथम येऊन त्यांनी ‘सीनियर रँग्लर’ हा बहुमान संपादन केला. त्यामुळे पाश्चात्त्यांमध्ये बौद्धिक श्रेष्ठत्वाच्या कल्पनेला पहिला धक्का बसला व पौर्वात्यांच्या बौद्धिक कार्यक्षमतेवर जगातील प्रगत राष्ट्रांतही विश्वास उत्पन्न झाला. १९०१ साली ते भारतात परतले आणि आय. सी. एस्. चा (इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा) मोह टाळून त्यांनी गरिबी जीवनाचा स्वीकार केला. ते फर्ग्युसन कॉलेजात प्राचार्य व गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले (१९०२–२४). १८९९ ते १९०१ च्या दरम्यान पॅरिस व गटिंगेन विद्यापीठांत त्यांनी उच्च अध्ययन पूर्ण केले.
प्राचार्यपदावरील प्रदीर्घ काळात परांजप्यांनी फर्ग्युसन कॉलेजला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला. तत्कालीन राजकीय, सामाजिक चळवळीतही त्यांनी भाग घेतला. ते स्वतःला बुद्धिवादी म्हणवून घेत. धार्मिक कर्मकांड, ईश्वर, परलोक, पुनर्जन्म इ. गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता. ते पक्के इहवादी व समाजसुधारणेचे कडवे पुरस्कर्ते होते. नॅशनल लिबरल फेडरेशनच्या उभारणीत त्यांचा वाटा मोठा होता. न्यायमूर्ती रानडे व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नेमस्त राजकारणाचा त्यांनी पुरस्कार केला. प्रसंगविशेषी त्यांनी लो. टिळकांच्या जहाल मतप्रणालीस विरोधही केला. उदारमतवादी नेमस्त पुढारी व बुद्धिवादी समाजसुधारक म्हणून त्यांची खाती होती. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले : मुंबई प्रांताचे शिक्षणमंत्री (१९२१–२३), अबकारी खात्याचे मंत्री (१९२७), इंडियन कौन्सिलचे सभासद (१९२७–३२), लखनौ व पुणे विद्यापीठांचे कुलगुरू (अनुक्रमे १९३२–३८ व १९५६–५९) व ऑस्ट्रेलियातील भारताचे हाय कमिशनर (१९४४–४७) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. पुणे नगरपालिकेचे ते काही काळ सदस्य होते. अनेक सरकारी समित्यांवर त्यांनी काम केले. ब्रिटिश सरकारने कैसर-इ-हिंद सुवर्णपदक (१९१६) व नाइटहूड (१९४२) देऊन त्यांचा गौरव केला.
परांजपे यांची निवडक लेखन–भाषणांचा संग्रह बी. एम्. गोरे यांनी संपादित केला आहे. एटीफोर नॉट आउट [मराठी अनुवाद नाबाद ८९ (१९६५)] हे त्यांचे छोटेसे इंग्रजी आत्मचरित्र नॅशनल बुक ट्रस्टतर्फे १९६१ साली प्रसिद्ध झाले. यांशिवाय द क्रक्स ऑफ द इंडियन प्रॉब्लेम हे त्यांचे पुस्तक उल्लेखनीय आहे. त्यांनी केलेले स्फुट लेखनही विपुल आहे. परांजप्यांचे बहुतेक सर्व लेखन इंग्रजीतच आहे. पुणे येथे त्यांचे निधन झाले.

  • १९६६: उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी, १८७६)

महिला तबलावादक आबान एचरशाह मिस्त्री- यांचे वडील हे व्हायोलिनवादक, तर आई खुर्शीद दिलरुबावादक होत्या. संगीताचे बाळकडू त्यांना आपल्या घरातूनच मिळाले. त्यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण गायनाच्या माध्यमातून त्यांच्या काकू मेहरू वर्किंगबॉक्सवाला यांच्याकडे झाले. त्यांचे उच्च शिक्षणदेखील गायनाच्याच माध्यमातून पं. लक्ष्मणराव बोडस यांच्याकडे झाले. तीस वर्षे इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत त्या हे गायनाचे शिक्षण घेत होत्या. दरम्यानच्या काळातच आबान मिस्त्री यांनी कथक नृत्यकलादेखील आत्मसात केली. पुढे प्रकृतीच्या काही कारणामुळे त्यांना कथक नृत्यकलेपासून परावृत्त व्हावे लागले. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या सांगीतिक जीवनात गुरू म्हणून पं. केकी जिजीना यांचा प्रवेश झाला. पं. जिजीनांनी आबानांना सतारच्या माध्यमातून शिक्षण दिले. इतकेच नव्हे, तर सतार हा विषय घेऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या विशारद परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
नृत्यकलेमधून निवृत्तीनंतरची लयीची कमी भरून काढण्यासाठी पं. जिजीना यांनी आबान यांना तबल्याचे धडे दिले. संगीताच्या एका माध्यमावर प्रभुत्व मिळण्यासाठी कलाकाराला अनेक वर्षे आणि बहुतांशी सबंध आयुष्य वेचावे लागते. आबानसारख्या बोटांवर मोजता येणार्या कलाकारांनाच संगीताची इतकी माध्यमे केवळ आत्मसातच होत नाहीत, तर त्यांवर त्यांचे प्रभुत्व असते. ज्या काळात स्त्रीचे जीवन केवळ चूल आणि मूल यांतच व्यतीत व्हायचे, त्या काळात आबानसारख्या स्त्रीने इतक्या विविध माध्यमांवर हुकमत मिळवणे आणि मंचावर त्यांचे सुयोग्य प्रदर्शन करणे हे केवळ कौतुकास्पदच नव्हे, तर आदरासही पात्र आहे. त्यांच्या या चौफेर व्यक्तिमत्त्वाला तबल्याच्या माध्यमातून पैलू पाडले ते उ. अमीर हुसैन खॉं यांनी. आबान मिस्त्रींचा तबला ऐकून उ. अमीर हुसैन खॉं यांनी त्यांना आपले शिष्यत्व बहाल केले. फरूखाबाद, दिल्ली, लखनौ, अजराडा या सर्व घराण्यांचे समृद्ध तबलावादन उ. अमीर हुसैन खॉंसाहेबांकडून त्यांना मिळाले. या चारही घराण्यांच्या बंदिशी, त्यांचा निकास, विचार-प्रक्रिया या सर्व गोष्टी त्यांना मिळाल्या. त्यांनी या सर्व शैलींचा अभ्यास करून त्यावर चिंतन करून या शैलींनी युक्त असणारी स्वतःची अशी एक शैली निर्माण केली. आबान मिस्त्रींचे लयीवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे असल्यामुळे त्यांनी तीनतालाव्यतिरिक्त झपताल, रूपक, पंचम सवारी इत्यादी तालांतही समर्थपणे वादन केले.
त्यांचे कार्यक्षेत्र त्यांनी तबल्यापुरतेच मर्यादित ठेवले नाही, तर त्यांनी पंडित नारायणराव मंगळवेढेकर यांच्याकडून पखवाजाचीदेखील विधिवत तालीम घेतली. त्यावर सखोल विचार व चिंतन केले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाकडून संगीताचार्य (पीएच.डी.) ही पदवी त्यांना त्यांच्या ‘तबला और पखावज के घराने एवं परम्पराएॅं’ या प्रबंधासाठी मिळाली. यासाठी त्यांनी तबला व पखवाजची विविध घराणी व परंपरा यांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. अनेक ऐतिहासिक पुरावे देऊन त्यांनी तबला हा भारतात पर्शियामधून अमीर खुस्रोने आणला हा गैरसमज खोडून काढला आहे. त्यांनी अनेक सभा-संमेलनांमध्ये वादन केले आहे. त्यांनी परदेशाच्या अनेक वार्या केलेल्या आहेत. युरोप, मध्य आशिया, रशिया इत्यादी देशांत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. तबल्याव्यतिरिक्त त्या हिंदी, संस्कृत विषयांत साहित्यरत्न आहेत. त्यांनी संगीतावर देश-विदेशांत अनेक प्रसिद्ध मासिकांतून लेखन केलेले आहे. पारशी समाजाच्या हिंदुस्थानी संगीतातील योगदानावर त्यांनी ‘दी पारसीज ॲशण्ड इंडियन क्लासिक म्यूझिक’ हा ग्रंथ लिहिला आहे. शिक्षण व प्रस्तुती या दोनच माध्यमांतून त्यांनी आपली संगीत सेवा थांबवली नाही. त्यापुढे जाऊन आबान यांनी अनेक चांगले शिष्य तयार केले. त्यांचे गुरू पं. जिजीना व त्यांनी एकत्रितपणे ‘स्वरसाधना समिती’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्या जवळजवळ ४० वर्षे सातत्याने नव्या, उदयोन्मुख कलाकारांना मंचप्रदर्शनाची संधी देत आहेत.
१९४०: प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबन मिस्त्री यांचा जन्म. (मृत्यू : २० सप्टेंबर, २०१२)

भुलाभाई देसाई – भुलाभाईंचा जन्म बलसाडला झाला. १८९५ मध्ये मॅट्रिक झाल्यावर त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून एम्. ए. ही पदवी घेतली (१९०१) व अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी पत्करली. तत्पूर्वी १८८२ मध्ये विद्यार्थिदशेतच इच्छाबेन या युवतीशी त्यांचे लग्न झाले. अहमदाबादला असतानाच भुलाभाई एल्एल्. बी. झाले वे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाची वकिली परीक्षा दिली (१९०५). त्यांनी मुंबईस वकिलीस सुरुवात केली व अल्पावधीतच तज्ञ वकील म्हणून नाव मिळविले.
पुढे मुंबई राज्यात ते ॲडव्होकेट जनरल झाले. त्यांनी पुढे होमरूलच्या चळवळीत भाग घेतला. गांधीजींच्या असहकारीतेच्या चळवळीपासून ते बदलू लागले. १९२५ साली ते ब्रूमफिल्ड समितीपुढे बार्डोलीच्या शेतकऱ्यांतर्फे उभे राहिले. १९३१ साली गांधी-आयर्विन कराराप्रमाणे बार्डोलीच्या शेतकऱ्यांची बाजू मांडली. १९३२ साली त्यांना कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल एक वर्ष शिक्षा व १०,००० रु. दंड झाला.
तुरुंगात त्यांची प्रकृती ढासळली व सुटका झाल्यावर ते वकिलीच्या काही कामानिमित्त इंग्लंडला गेले. तेथून परत आल्यावर त्यांनी काँग्रेसतर्फे पार्लमेंटरी बोर्ड स्थापण्याचा प्रयत्न केला. ते त्या बोर्डाचे सचिव व पुढे अध्यक्ष झाले. ते मध्यवर्ती कायदे मंडळात गुजरातमधून निवडून आले व विरोधी पक्षाचे नेते झाले. ते काँग्रेस वर्किंग कमिटीचे काही वर्षे सभासद होते. दुसरे महायुद्ध संपल्यावर आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवर दिल्लीच्या लाल किल्ल्यात जे खटले झाले, ते भुलाभाईंनी अत्यंत काळजीपूर्वक हाताळले. त्यांत त्यांना पूर्ण यश आले.
भुलाभाईंनी लियाकत अलींबरोबर जातीय प्रश्नांबाबत एक करारही केला होता. हा देसाई-लियाकत करार अमंलात आला नाही. काँग्रेस वर्किंग कमिटीने भुलाभाईंवर गांधीजींचा विचार न घेता हा करार केला, असा आरोप ठेवला. पुढे हंगामी (इंटेरिम) मंत्रिमंडळातही भुलाभाईंचा समावेश केला नाही. शिवाय निवडणुकीसाठी त्यांचे नावही सुचविले नाही. यांमुळे अखेरच्या दिवसांत त्यांची उपेक्षा झाली. यातच ते आजारी पडले. त्यांचे मुंबईस निधन झाले. इंग्रजीवरील त्यांचे प्रभुत्व, अस्खलित वक्तव्य आणि वकिलीतील अशीलाची बाजू मांडण्याची हातोटी यांमुळे ते अत्यंत लोकप्रिय होते. देसाई काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते व पुढे ते भारताचे स्वित्झर्लंडमध्ये राजदूत म्हणून गेले व तेथेच त्यांचे निधन झाले.

  • १९४६: भुलाभाई देसाई राजनीतीज्ञ यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १८७७)

घटना :
१५४२: सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.
१६३२: शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
१८१८: राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.
१८४०: पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.
१८८९: पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले.
१९४९: ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.
१९५४: रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
१९८३: अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
१९९४: इंग्लिश खाडी खालून जाण‍ाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडण‍ाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.
१९९७: बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.
१९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
२००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

  • मृत्यू :
  • १९२२: सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचे निधन. (जन्म:२६ जून, १८७४)
  • १९४६: भुलाभाई देसाई राजनीतीज्ञ यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १८७७)
  • १९९५: प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आचार्य गोविंदराव गोसावी येथे निधन.
  • १९९९: पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे येथे निधन.
  • २००१: विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर यांचे पुणे येथे निधन. (जन्म : १८ मार्च, १९०५)
  • २०२१ : राष्ट्रीय लोकदलाचे (RLD) अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी (Ajit Singh) यांचे निधन. (जन्म : १२ फेब्रुवारी, १९३९)

जन्म :
१८६१: भारतीय राजनीतीज्ञ मोतीलाल गंगाधर नेहरु यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी, १९३१)
१९२०: जुन्या पिढीतील संगीतकार गायक बुलो चंदीराम रामचंदानी उर्फ बुलो सी. रानी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे, १९९३)
१९४३: लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर यांचा जन्म.
१९५१: भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका लीला सॅमसन यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »