एल निनो …

आला आला एलनिनो दारा
सोबत नाही मान्सून वारा
पाऊस पाणी गेला माघारा
मिरवत आला खोटा तोरा ||१||
राजाने दिली याची खबर
राजाने सभेत उपाय केला
कमी खत पाण्याची पिकं घ्या
सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या||२||
पाणीप्रश्न सहज सोडवू
आला दुष्काळ , खावटी देवू
तृष्णा लागली , विहीर खोदू
चारा वाटू , टॅंकर वाढवू ||३||
निवडणूका झाल्यात सुरू
जबर पक्षप्रचार करू
बलात्कार, धर्मांतर गुन्हा
हे चक्र फिरते पुन्हा पुन्हा ||४||
पाणीसाठा जपून वापरा
रस्ते खोदून विकास करा
विरोधकांचे राजकारण
आपला धर्म सत्ताकारण||५||
कुंभमेळ्यात ती झाडं तोडू
एकाला पंधरा झाडं जोडू
महागाई, जॉब, पाणीप्रश्न
अवघड नाही हे साधे प्रश्न ||६||
इंजिनिअर कवी -वाळू आहेर नाशिक






