वसंतदादा पाटील कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याच्या प्रस्तावाला गती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. कारखाना भाडेतत्त्वावर देऊन त्याचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रस्तावावर मुंबईतील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली.

कारखाना सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावरील प्रस्तावासह विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यापूर्वी १६ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही बैठक झाली होती. त्या बैठकीत कारखाना चालविण्याचा प्रस्ताव, त्याची प्रक्रिया आणि संबंधित बाबींवर विचारविनिमय झाला.

राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर, आमदार डॉ. राहुल आहेर आणि संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते. कारखान्याच्या पुनरुज्जीवनाबाबत पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »