आचार्य दादा धर्माधिकारी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, डिसेंबर १, २०२४युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण १०, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:५६ सूर्यास्त : १८:००
चंद्रोदय: चंद्रोदय नहीं चंद्रास्त : १७:५७
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अमावस्या – ११:५० पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – १४:२४ पर्यंत
योग : सुकर्मा – १६:३४ पर्यंत
करण : नाग – ११:५० पर्यंत
द्वितीय करण : किंस्तुघ्न – ००:२०, डिसेंबर ०२ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : १६:३७ ते १८:००
गुलिक काल : १५:१४ ते १६:३७
यमगण्ड : १२:२८ ते १३:५१
अभिजितमुहूर्त : १२:०५ ते १२:५०
दुर्मुहूर्त : १६:३१ ते १७:१५
अमृत काल : ०६:२७, डिसेंबर ०२ ते ०८:०९, डिसेंबर ०२
वर्ज्य : २०:१९ ते २२:००

आज जागतिक एड्स दिन आहे

प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी यांचा जन्म इ.स. १८८९ मध्ये मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे नागपूरमध्ये शिक्षण असताना महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली, त्यावेळी म्हणजे इ.स. १९२० साली शिक्षण सोडून धर्माधिकारींनी चळवळीत उडी घेतली, आणि पुढे आयुष्यभर राष्ट्रकार्य केले.

धर्माधिकारी यांनी नागपूरच्या टिळक विद्यालयात शिक्षकाची नोकरी पत्करली. नोकरी दरम्यानदेखील ते स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीमध्ये भाग घेत राहिले. १९३५मध्ये ते वर्धा येथे राहू लागले. गांधी सेवा संघ या संस्थेचे ते सक्रिय कार्यकर्ता होते. तेथे असताना तेा भारतातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या संपर्कात आले.
भारत छोडो आंदोलनात झालेल्या त्यांच्या अटकेनंतर जेव्हा ते सुटून कारागृहाबाहेर आले, तेव्हा ते मध्य प्रदेशाच्या काउन्सिलवर निवडले गेले.

आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांचा सहभाग होता. आपल्या आयुष्यातली अनेक वर्षे दादा धर्माधिकारींनी दलितांच्या आणि महिलांच्या उत्थानासाठी वेचली.
दादा धर्माधिकारी हे वैचारिक क्रांतीच्या पक्षातले होते. त्यांच्या मते समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी लोकांच्या विचारांत परिवर्तन होणे आवश्यक आहे.
कॉलेजची कोणतीही पदवी हाती नसताना दादा धर्माधिकारी यांचा हिंदी, संस्कृत, मराठी, बंगाली गुजराती आणि इंग्रजी ग्रंथाचा चांगला अभ्यास होता. ते चांगले लेखक होते. हिंदी मराठी आणि गुजराती भाषेत त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत.

  • १९८५: स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचे निधन. (जन्म: १८ जून१८९९)

||गणपत वाणी बिडी पिताना|
| चावायाचा नुसतीच काडी; |
|म्हणायचा अन मनाशीच की|
|या जागेवर बांधिन माडी; ||

|मिचकावुनि मग उजवा डोळा|
| आणि उडवुनी डावी भिवयी,|
| भिरकावुनि ती तशीच ध्यायचा |
| लकेर बेचव जैसा गवयी. ||

|| गि~हाईकाची कदर राखणे; |
| जिरे, धणे अन धान्यें गळित, |
| खोबरेल अन तेल तिळीचे |
| विकून बसणे हिशेब कोळित; ||

|| स्वप्नांवरती धूर सांडणे |
| क्वचित बिडीचा वा पणतीचा |
| मिणमिण जळत्या; आणि लेटणे |
| वाचित गाथा श्रीतुकयाचा. ||

१९०९: मराठी नवकाव्याचे प्रणेते बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बी. सी. मर्ढेकर यांचा जन्म. (मृत्यू: २० मार्च१९५६)

  • घटना :
    १८३५: हान्स क्रिस्चीयन अँडरसन च्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
    १९१७: कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.
    १९४८: एस. एस. आपटे यांनी हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
    १९६३: नागालँड भारताचे १६ वे राज्य झाले.
    १९६४: मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
    १९६५: भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से – बिएसएफ) ची स्थापना झाली.
    १९७३: पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
    १९७६: अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
    १९८०: मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.
    १९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
    १९९२: कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर.
    १९९२: ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.
    १९९९: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.
    २०००: नागालँड येथे दरवर्षी १ ते ७ डिसेंबर दरम्यान होर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरवात झाली.

• मृत्यू :

• १९८८: प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे निधन. (जन्म : २ ऑक्टोबर, १९०८)
• १९९०: राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट, १९००)
• १९९५: साहित्यिक वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै, १९१४)

  • जन्म :
    १८८५: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक आचार्य काका कालेलकर यांचा जन्म. ( मृत्यू: २१ ऑगस्ट, १९८१ )
    १९११: पत्रकार, कथाकार, कवी आणि समीक्षक अनंत बाळकृष्ण अंतरकर यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर, १९६६)
    १९५०: भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मंजू बन्सल यांचा जन्म.
    १९५५: पार्श्वगायक उदित नारायण यांचा जन्म.
    १९६०: भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ शिरिन एम. राय यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »