श्री गजानन महाराज समाधी दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, ऑगस्ट २८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ६, शके १९४७
सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : १८:५६
चंद्रोदय : १०:२७ चंद्रास्त : २१:५९
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – १७:५६ पर्यंत
नक्षत्र : चित्रा – ०८:४३ पर्यंत
योग : शुक्ल – १३:१८ पर्यंत
करण : बालव – १७:५६ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : १४:१४ ते १५:४८
गुलिक काल : ०९:३१ ते ११:०५
यमगण्ड : ०६:२३ ते ०७:५७
अभिजित मुहूर्त : १२:१४ ते १३:०५
दुर्मुहूर्त : १०:३४ ते ११:२४
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२६
अमृत काल : ०१:४६, ऑगस्ट २९ ते ०३:३४, ऑगस्ट २९
वर्ज्य : १५:०० ते १६:४८

‘ गण गण गणात बोते ‘
॥ दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित । तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥ मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका । कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥ ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण । दिला मस्तकीं ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥ शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास । भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ||

आज संत श्रेष्ठ शेगाव निवासी श्री गजानन महाराज समाधी दिन आहे.

संत कवी दासगणु महाराज लिखित “श्री गजानन विजय ग्रंथ” प्रथम आवृत्ती भाद्रपद शु. पंचमी शके १८६१, ऋषि पंचमी ( १७ सप्टेंबर, १९३९ ) रोजी
भक्तगणांसाठी प्रकाशित करण्यात आली.

|| कुळीं कन्या पुत्र, होती जे सात्विक |
तयाचा हरिख, वाटे देवा |
पहाताती वाट, स्वर्गीचे पूर्वज|
वंशी भक्तराज, व्हावा कोणी ||
पुत्र नसलिया, कन्या तरी व्हावी |
हरीगुण गाई सर्वकाळ |
तुका म्हणे पितरे, आशिर्वाद देती |
कल्याण इच्छिती, निरंतर ||

कलावती आई बेळगाव – परमार्थात कलावती आईंनी नियमित उपासनेला महत्व व दिलेले आहे. आपला जठराग्नी विशिष्ट वेळेला जेवणाची वाट बघतो, निद्रा देवी जशी विशिष्ट वेळेला येते त्याप्रमाणे श्रीहरी देखील आपली वाट बघत असतो म्हणून नियमित आणि विशिष्ट वेळेच्या उपासनेचे आणि सामूहिक उपासनेचे महत्त्व विशेष असते हे पटवून दिले.

कलावती आई बेळगाव , आज जन्मदिन आहे. ( तिथीनुसार )
( परमपूज्य आईंनी ०८ फेब्रुवारी १९७८ म्हणजे माघ शुद्ध प्रतिपदेला महासमाधी घेतली.*

पदार्थवैज्ञानिक एम. जी. के. मेनन – भौतिकशास्त्रज्ञ मंबिल्लिकलातिल गोविंद कुमार मेनन तथा एम.जी.के. मेनन – डॉ. होमी बाबा यांच्या आग्रहास्तव 1955 मध्ये ते टाटा वेळी ही मूलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले. त्यावेळी संस्था नुकतीच बेंगलोर हून मुंबई हलवली होती. १९६६ मध्ये विमान अपघातात भाभा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा टाटा मूलभूत संस्थेच्या संचालकपदी जेआरडी टाटांनी नेमणूक केली.

त्यावेळी ते ३८ वर्षाचे होते. १९७५ पर्यंत मेनन या संस्थेचे संचालक राहिले. या संस्थेत असतानाच थोर संशोधक सी. व्ही. रामन यांनी मेनन यांना रामन ट्रस्टवर नेमले होते. त्यामुळे रामन यांच्या निधनानंतर राम रिसर्च या संस्थाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर पडली.
दोन दशकाहून अधिक कालावधीत त्यांनी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान धोरण निर्मिती महत्त्वाची भूमिका बजावली. विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आग्रहास्तव भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी १९७२ मध्ये नऊ महिने काम केले.

१९७४ मध्ये संरक्षण मंत्र्यांची वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. १९७४ ते १९७८ या काळात ते संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. १९७८ मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि 1980 मध्ये पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून त्यांनी नियुक्त करण्यात आली.
१९८२ ते १९८९ या कालावधीत नियोजन आयोगाचे सदस्य होते. तर १९८० ते १९८९ या कालावधीत ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार राहिले. १९८९ ते १९९० दरम्यान मेनन यांनी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. सरकारच्या मंत्रिमंडळात १९८९ मध्ये त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे राज्यमंत्री पद भूषवले. १९९० ते १९९६ या कालावधीत राज्यसभेचे खासदारही होते.

त्यांना १९६० चा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला. तसेच भारत सरकारने १९६१मध्ये पद्मश्री, १९६८ मध्ये पद्मभूषण, १९८५मध्ये पद्मविभूषण हे तीन पद्म पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

१९२८: भारतीय पदार्थवैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म. ( मृत्यू:22 नोव्हेंबर 2016 )

संघटनेचे पूर्णवेळ प्रचारक – बुद्धिजीवी प्रमुख • श्री उमाकांत केशव आपटे तथा बाबासाहेब आपटे – त्याग ज्ञान- मजूर = बाबासाहेब आपटे जी यांचा जन्म २८ ऑगस्ट १९०३ रोजी महाराष्ट्र-यवतमाळ येथील गरीब कुटुंबात झाला.

संस्कृत, हिंदी, मराठी आणि इतिहास याबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. वयाच्या १६ व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. आणि मग कौटुंबिक सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या.
बाळ गंगाधर टिळक यांचा विद्यार्थी जीवनापासून ते खूप प्रभावित होते. लोकमान्यांचा आदर्शांना संपूर्ण आयुष्य समर्पित होवो अशी त्यांची धारणा होती.
मॅट्रिक झाल्यानंतर मूर्तिजापूर या गावात अध्यापनाचे काम केले. एकदा बाबा साहेबांनी टिळक जयंती संकुल मध्ये साजरी केली. मुख्याध्यापक त्यांच्यावर प्रचंड संतापले. परिणामी त्यांनी राजीनामा पत्र दिले.

त्यानंतर देशसेवक मुद्रणालय नागपूर येथे काही काळ नोकरी केली. तसेच १९२३ मध्ये विद्यार्थी मंडळांची स्थापना केली. १९२३ ते १९२५ कालावधीत उद्यम मासिकात नोकरी केली. तसेच १९२५ ते १९३२ कालखंडात विमा कंपनीत सुद्धा नोकरी केली.
नागपुरात १९२६ मध्ये त्यांचा डॉ. हेडगेवारजी यांच्याशी संपर्क झाला आणि संघमय झाले. संघात नवीन जबाबदारी घेण्यास सुरवात केली. सुरवातीला बौद्धिक प्रमुख हे दायित्व होते.

सुरवातीला स्थापन केलेले विद्यार्थी मंडळ संघात विसर्जन केले. संघ कार्यासाठी नागपूर शहर व जिल्हा प्रवास सुरु केला. डॉ हेडगेवारांनी जन्गल सत्याग्रह केलेला असताना संघ शाखा सांभाळण्याचे महत्वाचे योगदान दिले. त्यामुळे त्यात डॉक्टरांची उणीव भासूं दिली नाही.

त्यानंतर विमा कंपनी नोकरीचा राजीनामा देऊन संघकार्यासाठी प्रचारकी जीवन व्रत घेतले. संघ प्रचारक म्हणून दिल्ली आणि पंजाब राज्यात संघाचा कार्य विस्तार केला.
त्यांचे अभ्यासाचे शील, परखडपणा, नैसर्गिक परिपक्वता, संभाषणाची अनोखी शैली, (त्याग ज्ञानाच्या श्रमाची त्रिवेणी) डॉ. हेडगेवार जी यांनी त्यांचे नाव ′′ बाबा साहेब ′′ ठेवले. दशावतार सारख्या प्राचीन कथा सांगण्याची त्यांची अप्रतिम शैली होती.

संघटनेच्या प्रचार, प्रसारासाठी रक्तपेशी व वयाचा एकेक क्षण समर्पित केला. त्यानंतर अखिल भारतीय प्रचारक प्रमुख , तसेच अन्य जबाबदाऱ्या पार पडत असताना देशभर अखंड प्रवास करीत होते.
१९०३ : रा. स्व. संघ प्रचारक उमाकांत केशव उपाख्य बाबासाहेब आपटे यांचा जन्म ( मृत्यू : २६ जुलै, १९७२ )

  • घटना :
    १८४५: सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
    १९१६: पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले.
    १९१६: पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.
    १९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.
    १९३७: टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.
    १९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.

• मृत्यू :

• १९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.
• २००१: लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२७)

  • जन्म :
    १८९६: उर्दू शायर रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९८२)
    १९०६: रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १२ जनेवारी १९९१)
    १९१८: मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)
    १९२८: सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च २००४)
    १९३४: सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा सुजाता मनोहर यांचा जन्म.
    १९५४: भारतीय-इंग्लिश अर्थशास्त्री रवी कंबुर यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »