भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, सप्टेंबर २८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक ६ शके १९४७
सूर्योदय : ०६:२८ सूर्यास्त : १८:२९
चंद्रोदय : ११:४९ चंद्रास्त : २२:४७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : आश्विन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – १४:२७ पर्यंत
नक्षत्र : ज्येष्ठा – ०३:५५, सप्टेंबर २९ पर्यंत
योग : आयुष्मान् – ००:३२, सप्टेंबर २९ पर्यंत
करण : तैतिल – १४:२७ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०३:३२, सप्टेंबर २९ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : वृश्चिक – ०३:५५, सप्टेंबर २९ पर्यंत
राहुकाल : १६:५९ ते १८:२९
गुलिक काल : १५:२९ ते १६:५९
यमगण्ड : १२:२९ ते १३:५९
अभिजित मुहूर्त : १२:०५ ते १२:५३
दुर्मुहूर्त : १६:५३ ते १७:४१
अमृत काल : १८:०५ ते १९:५३
वर्ज्य : ०७:२३ ते ०९:१०

नवरात्र ( सातवी माळ )

कालरात्री देवी : नवरात्रीचा सातवा दिवस देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपांपैकी एक आहे. तिला कालरात्री अथवा काली म्हणूनही ओळखले जाते. शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी देवीनं तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला. ती गडद रंग स्वीकारला. ती गाढवावर स्वार होते. तिला चार हात आहेत. तिच्याकडं तलवार, त्रिशूळ आणि एक फास आहे. चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वरद मुद्रा आहे. तिचा आवडता रंग ‘केशरी’ आहे. प्रसाद म्हणून भक्त देवीला गूळ देतात.

२०२३ : भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते.

भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी ‘एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केलेली आहे. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापन केला. (जन्म : कुंभकोणम, ७ ऑगस्ट, १९२५ )

१९०९ : दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठय अभिनेते पी . जयराज यांचा जन्म. ( मृत्यू : ११ ऑगस्ट, २००० )

क्रांतिकारक भगतसिंग – क्रांतिकार्यात बलिदानासाठी सर्वात पुढे असणारा असा नेता, निधड्या छातीने हौतात्म्याला सामोरा जाणारा ‘देशभक्त’, ‘प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी’, ‘जहाल क्रांतिकारक’ अशी भगत सिंग यांची ओळख आजही आपल्या मनात कायम आहे. भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उटलं त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली. शहीद भगत सिंग यांची आज जयंती आहे. तेव्हा शहीद भगत सिंग जयंतीनिमित्त फार क्वचित ऐकलेल्या त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी आपण जाणून घेऊया :

– तरुण वयातच आपल्या कार्याची दिशा त्यांना पक्की ठाऊक होती, ते बंडखोर होतेच पण जगातल्या सगळ्या दु:ख-दैन्याबाबत त्यांच्या मनात करुणाही होती म्हणूनच त्यांची ओळख क्रांतीकारी शहीद भगत सिंग बरोबरच एक उत्तम द्रष्टा, करुणा बाळगणारा मानवतावादी अशीही केली जाते. स्वत:वरील खटल्याचा वापर क्रांतीच्या प्रसारासाठी करणारा मुत्सद्दीपणाही त्यांच्या अंगी होता. वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी देशासाठी त्यांनी हसत हसत बलिदान दिलं.

– भगत सिंग यांची वाचनाची आवड इतकी प्रचंड होती की त्यांना फाशी देण्याआधी त्यांचे वकील प्राण नाथ मेहता यांनी आणलेलं पुस्तक त्यांनी भरभर वाचायला सुरूवात केली. त्यांच्या या पुस्तकवेडानं प्राण नाथ मेहताही अचंबित झाले होते.
– पुस्तक वाचनातून त्यांना ज्या काही गोष्टींची नव्यानं माहिती मिळत, समजत होती त्याची ते टिप्पणी तयार करत. तुरुंगात असताना त्यांनी काही पुस्तकं लिहिली होती. ‘द हिस्ट्री ऑफ द रिव्होल्युशनरी मूव्हमेंट ऑफ इंडिया’, ‘द आयडियल ऑफ सोशॅलिझम’, ‘ऑटोबायोग्राफी’ आणि ‘अॅट द डोअर ऑफ डेथ’ ही चार पुस्तकं लिहिली होती.
– दिल्ली असेंब्लीत बॉम्ब टाकण्यासाठी जाताना भगतसिंहांना माहीत होते की, आपण आता परत येणार नाही. तेव्हा त्यांनी आपले नवे बूट भेट म्हणून आपले सहकारी जयदेव कपूर दिले होते आणि त्याची जुनी पादत्राणे स्वत: घातली होती.

१९०७ : क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म ( बलिदान दिन: २३ मार्च, १९३१ )

भारतातील जास्तीत जास्त लोकांना माहीत असलेल्या भारतीय व्यक्ती कोण ? असा प्रश्न जर कुणी विचारला, तर ज्या एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा व्यक्ती आहेत, त्यात भारतरत्न लता मंगेशकर यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.

१९२९ : भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्मदिन ( मृत्यु : ६ फेब्रुवारी, २०२२ )

  • घटना :

१९२४ : पहिली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारी विमान फेरी पूर्ण झाली
१९२८ : सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोग शाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ आढळली. यातूनच पुढे पेनिसिलीन प्रतिजैविकांचा शोध लागला
१९३९ : दुसरे महायुद्ध – वॊर्सने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली
१९५८ : फ्रान्सने नवीन संविधान स्वीकारले
२००८ : स्पेसएक्स कंपनीने फाल्कन १ हे खाजगी अंतराळ प्रक्षेपित केले.

• मृत्यू :

१९६७ : क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचे निधन ( जन्म : १२ नोव्हेंबर, १८८० )
१९९२ : पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग.स. ठोसर यांचे निधन
१९९४ : विनोदी अभिनेते के ए थांगवेलू यांचे निधन ( जन्म : १५ जानेवारी, १९१७ )
२००० : सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधरपंत दाते यांचे निधन
२००४ : इंग्रजीतून लेखन करणारे लेखक डॉ मुल्कराज आनंद यांचे निधन ( जन्म : १२ डिसेंबर, १९०५ )
२०१२ : चित्रपट संकलनासाठी शोले चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक एम एस शिंदे यांचे निधन
२०१२ : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्र यांचे निधन ( जन्म : २९ सप्टेंबर, १९२८ )

*जन्म :

१८९८ : स्वातंत्र्य सैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र उर्फ मामाराव दाते यांचा जन्म
१९६६ : भारतीय दिगदर्शक , निर्माते व पटकथा लेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म
१९८२ : ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारे पहिले भारतीय खेळाडू अभिनव बिंद्रा यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »