राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, ऑक्टोबर ११, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक १९, शके १९४७
सूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:१९
चंद्रोदय : २१:५५ चंद्रास्त : १०:५२
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : आश्विन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : पञ्चमी – १६:४३ पर्यंत
नक्षत्र : रोहिणी – १५:२० पर्यंत
योग : व्यतीपात – १४:०७ पर्यंत
करण : तैतिल – १६:४३ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०३:२६, ऑक्टोबर १२ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : वृषभ – ०२:२४, ऑक्टोबर १२ पर्यंत
राहुकाल : ०९:२८ ते १०:५७
गुलिक काल : ०६:३१ ते ०८:००
यमगण्ड : १३:५३ ते १५:२२
अभिजित मुहूर्त : १२:०१ ते १२:४९
दुर्मुहूर्त : ०६:३१ ते ०७:१९
दुर्मुहूर्त : ०७:१९ ते ०८:०६
अमृत काल : १२:२५ ते १३:५२
अमृत काल : ०५:२६, ऑक्टोबर १२ ते ०६:५५, ऑक्टोबर १२
वर्ज्य : ०८:०३ ते ०९:३१
वर्ज्य : २०:३१ ते २२:०१.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हणले होते.
हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमित ऐकविले जाते. :-

हर देश में तू …
हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक, तू एकही है ।
तेरी रंगभुमि यह विश्वंभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥धृ॥
सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।
फ़िर नहर बनी नदियॉं गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।
कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥
यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥

आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी आहे.

श्री नानाजी देशमुख – लहानपणी भाजी विकून – पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती स्थान देऊन रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प नानाजी देशमुख यांनी देशभरात उभे केले.

प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, व नंतर उत्तर प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते – प्रचारक असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन प्रमुख (सरसंघचालक) श्री गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. यातूनच जनसंघाची स्थापना झाली.

दीनदयाळ उपाध्याय, सुंदरलाल भंडारी, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. नंतर जनता पक्षाच्या माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले. पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, चरणसिंग या अन्य विचारधारेच्या नेत्यांशीही त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. दरम्यानच्या काळात आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही ते सहभागी झाले होते. सुमारे दोन महिने ते विनोबाजींबरोबर प्रवास करत होते. पण त्यानंतरच्या काळात मनुष्यविकास व सामाजिक विकास याबाबतच्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रीपद नाकारले. त्या काळात राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता, अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती. पण त्यांनी तो मोह निग्रहाने नाकारून, राजकारण-संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. या विचारातूनच त्यांनी दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन केली.

पुढील काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून सर्वप्रथम उत्तर प्रदेशामधील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले. सुमारे ४०,००० कूपनलिकांच्या माध्यामातून त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे काम केले.

त्यानंतर मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ८० दुर्गम, पहाडी गावांमधील जनतेला विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर त्यांनी मुख्य लक्ष केंद्रीत केले. पाणी अडवा – पाणी जिरवा या माध्यमातून सिंचनक्षेत्रात वाढ, गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण,उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य, आरोग्यधाम योजनेअंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन व याच पद्धतीचे अनेक प्रकल्प चित्रकूट परिसरात कार्यान्वित केलेले आहेत. येथेच नानाजींनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले.

हे प्रकल्प सक्षमतेने चालवण्यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणाऱ्या दांपत्यांना त्यांनी समाजशिल्पी बनवले. या समाजशिल्पींच्या माध्यमातून दीनदयाळ शोध संस्थेची विधायक, विकासात्मक कामे वेगाने,योग्य दिशेने व निष्ठेने चालू आहेत. आर्थिक, औद्योगिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावांची संकल्पना येथे अस्तित्वात आलेली दिसते.

आणीबाणीनंतरच्या काळात (इ.स. १९७७) नानाजी काही काळ लोकसभेचे सदस्य होते. इ.स. १९९९ मध्ये त्यांची राज्यसभेवरही निवड करण्यात आली.
१९९७ मधे पुणे विद्यापीठाने त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही सन्माननीय पदवी प्रदान केली.आणि सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब बहाल केला.

१९१६: भारतरत्न ( मरणोत्तर ) समाजसुधारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्म. ( मृत्यू: २६ फेब्रुवारी, २०१० )

सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक डॉ विजय भटकर – अमेरिकेतील क्लिंटन प्रशासनाने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला त्यावेळी माहिती तंत्रज्ञानात आपली पीछेहाट होणार अशी चिन्हे असताना डॉ. विजय भटकर यांच्या प्रयत्नांमुळे ‘परम’ महासंगणक तयार झाला. नंतर भारताने हा महासंगणक रशिया, सिंगापूर, जर्मनी व कॅनडा यासारख्या प्रगत देशांना निर्यातही केला, त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची स्वयंपूर्णता सिद्ध झाली. नुकताच भटकर यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘सीताराम जिंदाल फाऊंडेशन पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
भटकर यांनी १९९०च्या दशकात सी-डॅक या संस्थेतर्फे ‘परम’ तयार करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले.

परम ८००० व परम १०००० असे दोन प्रगत महासंगणक त्यांच्या प्रयत्नातून साकार झाले. आज आपण बहुभाषिक संगणक हवे आहेत असे म्हणतो, पण ‘सी-डॅक’च्या ‘जिस्ट’ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दहा लिप्यांमधील १६ प्रमुख भाषा संगणकावर आणून ज्ञानकोषीय तूट भटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरून काढली होती. सी-डॅकच्या माध्यमातून त्यांनी पाच हजाराहून अधिक सॉफ्टवेअर व्यावसायिक घडवले. आय स्क्वेअर आयटी, एमकेसीएल या संस्थांच्या पायाभरणीतही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. भारतातील सर्वोत्तम मानले जाणारे केरळ इन्फोटेक पार्क (त्रिवेंद्रम) उभे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘एज्युकेशन टू होम’ हा कार्यक्रमही त्यांनी प्रभावीपणे राबवला. गेल्या पंचवीस वर्षांत ज्यांनी भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाला आकार दिला त्यात डॉ. भटकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

विचारवंत, नेतृत्वगुण असलेला वैज्ञानिक, संशोधक, शिक्षणतज्ञ, लेखक, धोरणकर्ते म्हणून ते देशाला परिचित आहेत. भटकर यांचा जन्म अकोल्यातील मुरांबा या गावी ११ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला. नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली व नंतर बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी घेतली. दिल्ली आयआयटी या संस्थेचे ते डॉक्टरेट आहेत. संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावर त्यांची अनेक पुस्तके व शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, प्रियदर्शिनी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार असे असंख्य पुरस्कार त्यांना लाभले.

• १९४६: पद्मश्री पुरस्कार सन्मानित परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक डॉ विजय भटकर यांचा जन्म. आणि त्यांना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • घटना :
    १८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना.
    १९८७: श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली.
    २००१: व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर.
    २००१: पोलरॉईड कार्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली.

मृत्यू :
• १९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९०९)
• १९८४: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर ऊर्फ खंडू रांगणेकर यांचे निधन. (जन्म: २७ जून १९१७)
• १९९४: कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक काकासाहेब दांडेकर यांचे निधन.
• १९९६: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९४३)
• १९९७: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार विपुल कांति साहा यांचे निधन.
• १९९९: मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचे निधन.
• २०००: स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री डोनाल्ड डेवार यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९३७)
• २००२: अभिनेत्री दीना पाठक यांचे निधन.
• २००७: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट१९३१)

  • जन्म :
    • १८७६: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचा चांचल, माल्डा, बांगला देश येथे जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ – कलकत्ता)
    • १९०२: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. ( मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ )
    • १९१६: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म. ( मृत्यू: ४ जून १९९७ )
    • १९३०: पत्रकार व स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)
    • १९३२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट २०१२)
    • १९४२: चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांचा जन्म.
    • १९५१: हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर, १९९७ )
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »