दिनविशेष: जागतिक पियानो दिन

आज रविवार, मार्च २९, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र ८, शके १९४८
सूर्योदय : ०६:३५ सूर्यास्त : १८:५२
चंद्रोदय : १५:४५ चंद्रास्त : ०४:३८, मार्च ३०
शक : १९४८
संवत्सर :पराभव
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह :चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : कामदा एकादशी – ०७:४६ पर्यंत
नक्षत्र : आश्लेषा – १४:३८ पर्यंत
योग : धृति – १८:२० पर्यंत
करण : विष्टि – ०७:४६ पर्यंत
द्वितीय करण : बव – १९:२५ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : कर्क – १४:३८ पर्यंत
राहुकाल : १७:१९ ते १८:५२
गुलिक काल : १५:४७ ते १७:१९
यमगण्ड : १२:४३ ते १४:१५
अभिजित मुहूर्त : १२:१९ ते १३:०८
दुर्मुहूर्त : १७:१३ ते १८:०२
अमृत काल : १३:०२ ते १४:३८
वर्ज्य : ०२:४३, मार्च ३० ते ०४:१९, मार्च ३०
आज जागतिक पियानो दिन आहे.
(पियानो हे ८८ कळांचे झंकारणारे वाद्य आहे म्हणून प्रतिवर्षी ८८ व्या दिवशी साजरा करतात.)
२९ मार्च हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय नौका दिन’ (National Boating Day) म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस भारतीय नौदलाचे जनक व आरमार प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित आहे, ज्यांनी भारतीय समुद्रात वर्चस्व निर्माण केले व स्वराज्य सुरक्षित राखण्यासाठी आरमाराची स्थापना केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीला आणि भारतीय आरमाराच्या इतिहासाला उजाळा देणे हा राष्ट्रीय नौका दिनाचा उद्देश आहे.
‘ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’ या तत्त्वानुसार सागरी किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यावर भर देणे.
हा दिवस भारतीय नौदलाच्या शौर्याची आठवण करून देणारा आहे.
आज राष्ट्रीय नौका दिन आहे.
इंग्लिश लेखिका पुपुल जयकर – त्या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या होत्या. पुपुल जयकर यांचे वडील सुरतचे विनायक एन. मेहता अलाहाबाद येथे आय.सी.एस. अधिकारी होते. पुपुल जयकर यांचे बरेचसे बालपण अलाहाबादमध्ये गेले. तेव्हा त्यांचे नेहरू घराण्याशी संबंध जुळले. १९३० साली त्यांचा इंदिरा गांधींशी परिचय झाला. नंतर १९५० साली मुंबईत भेट होऊन त्यांची गाढ मैत्री झाली, ती इंदिरा गांधींच्या १९८४ सालच्या मृत्यूपर्यंत टिकली.
लंडन विद्यापीठातील बेडफर्ड महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यावर पुपुल जयकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाकडे नोकरीसाठी अर्ज केला. तेव्हा आम्ही तुमचे लेख छापू, पण महिलांना आम्ही नोकरीमध्ये घेत नसतो असे त्यांनी कळवले. लंडनमध्ये असतानाच पुपुल मेहता यांचे बॅरिस्टर मनमोहन मोटाभाई जयकर यांच्याशी लग्न झाले.
इ.स. १९४१ साली काँग्रेस पक्षात सामील झाल्यावर जयकांचीर रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, युसुफ मेहेरअली यांच्यांशी ओळख झाली. १९४८ साली जे. कृष्णमूर्तींची भेट झाल्यावर जयकर यांच्यावर कृष्णमूर्तींचा प्रभाव पडला.
पुपुल जयकर भारतातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विश्वस्त होत्या. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान येथे झालेल्या भारतीय महोत्सवाच्या त्या मुख्य सूत्रधार होत्या. त्या पुढे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲन्ड कल्चरल हेरिटेग (इन्टॅक) या संस्थेच्याही अध्यक्ष झाल्या.
त्यांच्या विविध पुस्तक लेखनाबद्दल १९६७ साली भारत सरकारने पद्म भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.
• १९९७: सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)
भक्तीगंधर्व कमलाकर तपस्वी काका – ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ या गजराने हजारो लोकांना अध्यात्माची गोडी लावणारे व्यक्तिमत्व म्हणून तपस्वी काका परिचित होते.
लहान वयापासून कीर्तनाचा छंद असलेल्या तपस्वी काका यांनी समर्थ संगीत विद्यालयाच्या हरिभाऊ गावे यांच्याकडे शास्त्रीय आणि सुगम संगीताचे शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठात संगीताचे शिक्षण घेत असताना ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते.
संगीत साधनेमध्ये खंड पडू नये, म्हणून सरकारी नोकरी सोडून ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये रुजू झाले.
१९९९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. स्वामी समर्थांवर गीतलेखन करणाऱ्या तपस्वी यांनी स्वामी गीते स्वरबद्ध केली आहेत. पार्श्वगायक आणि संगीतकार म्हणून सन्मान लाभलेल्या तपस्वी यांनी भजन गायनाचे साडेचार हजारांहून अधिक कार्यक्रम केले आहेत. तपस्वी काकांनी ७०० हून अधिक गीतांचे लेखन केले; तसेच श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, श्री चिले महाराज, श्री शंकर महाराज, श्री साई बाबा आणि श्री गणेशगिरी महाराज अशा सहा विभूतींच्या लीलामृत पोथ्यांचे लेखनही त्यांनी केले आहे.
तपस्वी काका स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते. अध्यात्माचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते अध्यात्मावर निरूपण करीत होते. त्यांना गुरु महात्म्य पुरस्कार, मंगलभवन सेवा मंडळाचा सन्मानचिन्ह मानकरी पुरस्कार, नवोदय मानव विकास सेवा संस्थेचा भक्तिगंधर्व पुरस्कार, प्रज्ञाचक्षु पुरस्कार, संगीत रत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
( काकांनी त्यांची अधू असलेली दृष्टी कधीही त्यांच्या व्यापक कार्यात आड येऊ दिली नाही )
‘आजपर्यंत स्वामींवर मी मोठ्या प्रमाणात लेखन केले, पण यामागे लेखक, गीतकार म्हणून मी निमित्त आहे. त्यांनीच मला शब्द दिले आणि त्यातून गीतनिर्मिती झाली,’ असे ते आवर्जून नमूद करायचे.
२०१७ : भक्तीगंधर्व कमलाकर तपस्वी काका यांचे निधन.
- घटना :
१८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.
१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.
१९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.
१९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
• मृत्यू :
• १५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५०४)
• १९६४: इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.
- जन्म :
१९०५ : संतसाहित्याचे अभ्यासक,विद्याव्यासंगी भाष्यकार आणि लेखक पुरुषोत्तम मंगेश लाड यांचा जन्म.
( मृत्यू : २४ मार्च १९५७)
१९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च, २०१०)
१९२९: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३)
१९३९ : विनोदाची उत्तम जाण असलेले ४०० पेक्षा अधिक चित्रपटात काम केलेले बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप यांचे ( सय्यद इश्ताक अहमद जाफरी ) यांचा जन्म. ( मृत्यू : ०८ जुलै, २०२० )
१९४८: साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.






