डॉ. शिवाजीराव कदम यांच्यावरील *शुगरटुडे* विशेषांकाचे प्रकाशन

पुणे : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे संस्थापक, नामवंत शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शुगरटुडे’ने काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. कदम यांच्या उपस्थितीतच झाले.
यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या अंकामध्ये डॉ. शिवाजीराव कदम यांच्या साखर उद्योगातील योगदानाचा संक्षिप्त आढावा घेण्यात आला आहे. कारखान्याच्या पायाभरणीपासून, अवघ्या नऊ महिन्यांमध्ये पहिला गाळप हंगाम कसा घेतला, याबाबतची माहिती विशेष लेखामध्ये देण्यात आली आहे.
उदगिरी शुगरने सातत्याने पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसेच नेहमीच शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम दिली आहे. त्यामुळे कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास अल्पावधीतच जिंकला. डॉ. कदम यांचा वारसा त्यांचे सुपुत्र डॉ. राहुलदादा कदम अत्यंत समर्थपणे चालवत आहेत. कारखान्याला अनेक पुरस्कारप्राप्त झाले आहेत.