साखर आयुक्तांचे ‘शुगरटुडे’कडून स्वागत

पुणे : महाराष्ट्राचे नवे साखर आयुक्त मा. श्री. सिद्धाराम सालिमठ (भाप्रसे) यांचे गुरुवारी ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
साखर आयुक्त श्री. सालिमठ यांच्या पाठीशी प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी राज्यात विविध पदांवर काम करताना, आपल्या कार्याचा केवळ ठसाच उमटवला नाही, तर खास ‘पॅटर्न’ निर्माण केले आहेत. त्यामुळे साखर उद्योगाच्या आशा उंचावल्या आहेत.
‘शुगरटुडे’चे मुख्य संपादक नंदकुमार सुतार यांनी साखर आयुक्तांची भेट घेतली आणि ‘शुगरटुडे’च्या साखर आणि सहकार क्षेत्रांसाठी समर्पित असलेल्या पत्रकारितेबाबत थोडक्यात माहिती दिली.