‘श्री विघ्नहर’ निवडणूक : १७ संचालक बिनविरोध

आवडल्यास ही बातमी शेअर करा

चार जागांसाठी शनिवारी मतदान

पुणे : जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखालील १७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे, अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले.

उर्वरित ४ जागांसाठी शनिवारी (१५) निवडणूक होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाकारखान्याची निवडणूक जरी लागली असली तरी विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचीच सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे. शिरोली बुद्रुक गट व इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातील निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे.

शेतकरी आणि कारखान्याच्या हितासाठी शेतकरी संघटनेची माघार
यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र शेतकरी आणि साखर कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी अंबादास हांडे, संजय भुजबळ, खांडगे, संभाजी पोखरकर, सविता शिंदे आदीं १५ जणांनी माघार घेतली, असे असल्याचे प्रमोद खांडगे यांनी सांगितले.


शिरोली बु. उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघातील ३ जागांसाठी ४ उमेदवार व इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघाच्या १ जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. तसेच उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. मतदान शनिवारी (दि. १५ मार्च) सकाळी ८ ते ५ वेळेत होणार असून मतमोजणी रविवारी (दि. १६) होईल.

शिरोली बुद्रुक गटातील तीन जागांसाठी चार उमेदवार पुढीलप्रमाणे : विद्यमान अध्यक्ष सत्यशीलदादा शेरकर, रहेमान मोमीन इनामदार, संतोष खैरे व सुधीर खोकराळे.

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातील एका जागेसाठी उमेदवार : सुरेश गडगे, निलेश भुजबळ व रहेमान मोमीन इनामदार,


बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणेः

उत्पादक सभासद प्रतिनिधी जुन्नर गट १- (३ जागा): अशोक घोलप, अविनाश पुंडे, देवेंद्र खिलारी,
उत्पादक सभासद प्रतिनिधी-ओतूर गट ३- (४ जागा): धनंजय डुंबरे, प्रमोद बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर,
उत्पादक सभासद प्रतिनिधी पिंपळवंडी गट ४- (३ जागा): विवेक काकडे, विलास दांगट, प्रकाश जाधव.

उत्पादक सभासद प्रतिनिधी घोडेगाव गट- ५ (३ जागा): यशराज काळे, नामदेव थोरात व दत्तात्रय थोरात.

अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी (१ जागा): प्रकाश सरोगदे.
भटक्या-विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी (१ जागा) – संजय खेडकर.
महिला राखीव प्रतिनिधी (२ जागा)– नीलम तांबे, पल्लवी डोके

विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप यांच्यासह संतोष खैरे, धनंजय डुंबरे, विवेक काकडे, देवेंद्र खिलारी, यशराज काळे, नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात, प्रकाश सरोगदे, नीलम तांबे, पल्लवी डोके या विद्यमान संचालकांना उमेदवारीत पुन्हा संधी मिळाली आहे. माजी संचालक प्रकाश जाधव, विलास दांगट, सुरेश गडगे यांना नव्याने संधी मिळाली आहे. तर अविनाश पुंडे, बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर, संजय खेडकर, सुधीर खोकराळे हे नवीन चेहरे आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »