‘उदगिरी शुगर’मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या कारखान्यावर ४ ते ११ मार्च या कालावधीत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सप्ताह साजरा करण्यात आले आहे. कारखान्याचे चिफ इंजिनिअर महेश अहेर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांचे सेफ्टी ऑफिसर अभिषेक पाटील यांनी स्वागत केले. कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह हा आज राष्ट्रीय सुरक्षा दिवस सुरक्षाविषयक माहितीची रॅली, सुरक्षा साहित्याचे प्रदर्शन, ट्रेनिंग, सुरक्षा पोस्टर, मॉकड्रिल आदी उपक्रम रावबून साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी सेफ्टी ऑफिसर अभिषेक पाटील यांनी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व विशद करुन सर्व उपस्थितांना सुरक्षा व आरोग्य याबाबतची प्रतिज्ञा दिली. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी जाधव यांनी सुरक्षा जनजागृती, कार्यस्थळी सुरक्षितता आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
सुरक्षा साहित्याचा वापर कसा करायचा? कामगारांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजना तसेच स्वतःचा इतर कामगारांचा बचाव कशा पद्धतीने करावयाचा, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या निमित्त विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम व सीएमडी डॉ. राहुलदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल चालू आहे. यावेळी कारखान्याचे उत्तम पाटील, अनिल काटे, किशोर साळुंखे, निवास पवार, सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.