आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन
आज शनिवार, नोव्हेंबर १६, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक २५, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:४७ सूर्यास्त : १८:००
चंद्रोदय : १८:१९ चंद्रास्त : ०७:०३
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : प्रतिपदा – २३:५० पर्यंत
नक्षत्र : कृत्तिका – १९:२८ पर्यंत
योग : परिघ – २३:४८ पर्यंत
करण : बालव – १३:२१ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २३:५० पर्यंत
सूर्य राशि : तूळ – ०७:४१ पर्यंत
चंद्र राशि : वृषभ
राहुकाल : ०९:३५ ते १०:५९
गुलिक काल : ०६:४७ ते ०८:११
यमगण्ड : १३:४७ ते १५:१२
अभिजितमुहूर्त : १२:०१ ते १२:४६
दुर्मुहूर्त : ०६:४७ ते ०७:३१
दुर्मुहूर्त : ०७:३१ ते ०८:१६
अमृत काल : १७:१९ ते १८:४५
वर्ज्य : ०८:४१ ते १०:०८
आज आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन आहे.
‘यज्ञी ज्यांनी देऊन निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर! परि जयांच्या दहनभूमीवर, नाही चिरा नाही पणती। तिथे कर माझे जुळती ’ या पंक्तीला पात्र ठरलेले असंख्य वीर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या देहाच्या समिधा अर्पण करून गेले.
अशा अनाम स्वातंत्र्यवीरांपैकी एक विष्णू गणेश पिंगळे. आज त्यांचा स्मृतिदिन. पुणे जिल्ह्यातील शिरूर गावी जन्मलेला हा युवक यंत्रविशारद पदाचा अभ्यासक्रम पूर्ण करून अमेरिकेत गेला आणि लाल हरदयाळांच्या गदर पार्टीत सहभागी झाला. बॉम्ब तयार करून एकाच वेळी अनेक ब्रिटिश लष्करी छावण्या उद्ध्वस्त करण्याची योजना लाल हरदयाळांनी आखली, ती अशाच तळहातावर शिर घेऊन झुंजणा-या सहका-यांच्या बळावर! गदर पार्टीने ही योजना आखली. मनसुबे रचले गेले. पण फितुरीने घात केला. ही योजना लाला हरदयाळ आणि विष्णू गणेशसारखे त्यांचे सहकारी राबवू शकले नाहीत. पिंगळेंना अटक झाली. त्यांच्यासह सात क्रांतिकारकांना दि. १६ नोव्हेंबर १९१५ रोजी फाशी देण्यात आले. लाहोरच्या तुरुंगात फासावर लटकताना पिंगळे म्हणाले, ‘‘मायभूमीला स्वतंत्र करावे ही एकच इच्छा होती. तेच ध्येय होते. आमचे बलिदान ज्यासाठी आहे ते आमचे ध्येय देवाने पूर्ण करावे.’’ आज विष्णू गणेश पिंगळे यांचा तसेच त्यांचे सहकारी कर्तारसिंह सराबा , सरदार बक्षीससिंह , सरदार जगनसिंह, सरदार सुरायणसिंह, सरदार बुटासिंह , सरदार ईश्वरसिंह, सरदार हरनामसिंह यांचा हुतात्मा दिन
१९१५: लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.
- कुणी घर देता का घर …’
नटसम्राट’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच.
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता.
भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. त्यांच्या पत्नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.
१९२७: मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर,,२०१९)
- घटना :
१८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
१८९३: डॉ. अॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.
१९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.
१९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
१९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
१९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
१९९६: कोकण रेल्वेच्या रत्नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.
१९९६: चतुरंग प्रतिष्ठान च्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड.
१९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
२०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.
२०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.
• मृत्यू :
• १९६७: संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचे निधन. (जन्म: १४ जुलै, १९१७)
• २०१५: प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी, १९२९ )
- जन्म :
१८९४: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी, १९७५)
१९१७: संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी, १९९१)
१९२८: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै , २००६)
१९३०: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून, १९९७)
१९६३: अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म.
१९६८: भारतीय राजकारणी शोभाजी रेगी यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल , २०१४)
१९७३: बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म.