अवर्षण (दुष्काळ)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पडेना पाऊस,फिटेना कर्ज,
दुबार पेरणीचा वाया गेला अर्ज |

जनावरं चारा पाण्यावाचून उपाशी,
वाया गेली मुग-सोयाबीन-कपाशी |

द्या दिलासा रोजगार हमी सुरू करून,
पिक विम्याचं गाजर दाखवून |

बारा हजाराचा लॉलीपॉप देऊन,
तरीही कष्टकरी वंचित भाकरी पासून |

शिवभोजन अन आरक्षण काम येईना,
कर्ज माफीचा मलम असर करीना |

नको रेवडी अहो बांधा धरणे बंधारे,
नको दिखावा, शाश्वताची कास धरारे |

उपाशी अर्धपोटी जनावरे- माणसे,
दिसेना हो कुठं बाजरीला कणसे |

द्या मागेल त्याला काम, घामाचे दाम,
जाणून आहे जनता,कामामधे राम |

मायबाप सरकार करा एवढं काम,
नको सबसिडी अन जुलमाचा रामराम
||


रचनाकार:
वा.र. आहेर, नाशिक

(साखर उद्योग क्षेत्राटिल नामवंत सल्लागार)
9958782982

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »