जन्म ऊसाचा – ऊसाचा, खूप घाईचा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रविवारची कविता

(चाल-जन्म बाईचा बाईचा, खूप घाईचा)

पुरवा डोहाळे रोपवाटिकेत एकडोळ्याचे,
मोहरली काया काय सांगु काय जहाले ।
अहो बीज अंकुरले अहो बीज अंकुरले,
सव्वा महिन्यात पाच फुट सरीत पहुडले।।
जन्म ऊसाचा ऊसाचा , खूप घाईचा …..

नोंद झाली, नोंद झाली कारखान्याला,
मालकाने बांधलं वचननाम्याला ।
मायेने करी मालकीण निंदणी- खुरपणी,
ऊस पोटरला मिळे येळेला खतपाणी ।।
जन्म ऊसाचा ऊसाचा , खूप घाईचा…

पोटच्या पोरागत मालक गोंजारतसे,
म्हणे ऊस डोक्यावरून फिरला असे ।
म्हणे मालकीण यंदा कर्ज फिटेल माझं,
अहो कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझं ।।
जन्म ऊसाचा ऊसाचा खूप घाईचा ….

केव्हा तरी नजर लागली मुकादमाची,
टोळीआली ताज्या दमाची, ताज्या दमाची ।
एका दिसात ऊस झाला, ऊभ्याचा आडवा,
साखरेसाठी घेतला हो घोट कडवा ।।
जन्म ऊसाचा ऊसाचा खूप घाईचा….

रचनाकार:

आहेर वा.र. , नासिक
९९५८७८२९८२

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »