साखर कामगारांच्या प्रश्नांचे सरकारला गांभीर्य नाही : काळे
इस्लामपूर : प्रत्येकाने आपण कुठे कमी पडतो याचे आत्मचिंतन करावे. यातूनच आपण साखर कामगारांना ताकदीने न्याय मिळवून देवू शकतो, असा विश्वास महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासो काळे यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही. त्यामुळे कामगारांना न्याय देण्याची जबाबदारी आपणावरच आहे, असे ते म्हणाले.
इस्लामपूर येथे सांगली जिल्हा साखर कामगार समन्वय समिती व वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील साखर कामगार मेळाव्यात ते बोलत होते. राज्य सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष राऊसो पाटील, उपाध्यक्ष प्रदीप शिंदे, युवराज रणवरे, संजय मोरबाळे, सयाजी कदम, संजय पाटील, अविनाश पाटील, आझाद शेख, अशोक पवार, रावसाहेब भोसले, डी. एम. नरसे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी खा. शरद पवार यांना धमकी देणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्यात आला.