शेतकरी प्रगतीचा ‘साखर’ मार्ग

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हंगामाची सांगता

अहमदपूर: साखर कारखाने हे केवळ उद्योग नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे मुख्य केंद्र आहेत,असे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.उजना (ता. अहमदपूर) येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या १४ व्या ऊस गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की,या हंगामात कारखान्याने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच ५ लाख १२ हजार टन ऊसाचे यशस्वी गाळप केले आहे.

हा कारखाना उभारण्यात उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज कारखाना प्रगतीपथावर असल्याचे नामदार पाटील यांनी नमूद केले.
या यशस्वी हंगामात मोलाचा वाटा उचलणाऱ्या शेतकरी आणि कंत्राटदारांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव होते. यावेळी सूरज पाटील (सभापती, अहमदपूर पंचायत समिती), पी.जी. होनराव (उपाध्यक्ष), शिवाजीराव देशमुख, गोविंद पाटील आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »