ऊसतोड मजुरांचा ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास

कराड : येथील जवळपास चार ते पाच ऊसतोडणी मजुरांच्या खोपीतून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच नांदगाव येथील मुक्तेश्वर माळ परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शरद उत्तम गोरे, अशोक नामदेव सुळ, सतिश श्रीमंत यादव, राधाकिसन सूर्यभान सुळ अशी चोरी झालेल्या ऊसतोडणी मजुरांची नावे आहेत. या सर्व घटनांमध्ये एकूण १८.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे ४६ हजार २५० रुपये किमतीचे व ३१ हजार १५० रुपये रोख रक्कम, असा सुमारे ७७ हजार ४०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.
चोरीच्या घटनांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे






