थोरले बाजीराव पेशवे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, एप्रिल २८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख ८, शके १९४७
सूर्योदय : ०६:१२ सूर्यास्त : १९:००
चंद्रोदय : ०६:१७ चंद्रास्त : १९:४७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : प्रतिपदा – २१:१० पर्यंत
नक्षत्र :भरणी – २१:३७ पर्यंत
योग : आयुष्मान् – २०:०३ पर्यंत
करण : किंस्तुघ्न – ११:०५ पर्यंत
द्वितीय करण : बव – २१:१० पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : मेष – ०२:५३, एप्रिल २९ पर्यंत
राहुकाल : ०७:४८ ते ०९:२४
गुलिक काल : १४:१२ ते १५:४८
यमगण्ड : ११:०० ते १२:३६
अभिजित मुहूर्त : १२:१० ते १३:०२
दुर्मुहूर्त : १३:०२ ते १३:५३
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२६
अमृत काल : १७:२६ ते १८:५०
वर्ज्य : ०९:०२ ते १०:२६

‘मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन.’

  • शाहूमहाराज

रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.

उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर,१७२३), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७मे, इ.स. १७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा “सक्सेस रेट” “१००%” आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार.

शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण “मैदानी लढाई” लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मॉन्टगोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ने बाजीरावाची स्तुती पुढीलप्रमाणे केली आहे – “The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility”. उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि पुण्याला मिळवून दिले.

• १७४०: थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट , १७००)

प्रसिद्ध कन्नड कवी, नाटककार, साहित्यसमीक्षक व शिक्षणतज्ञ डॉ. गोकाक, विनायक कृष्ण ( जन्म धारवाड जिल्ह्यातील सावनूर )

त्यांनी कन्नड काव्यात काही प्रवाह आणले व विविध प्रयोगही केले. त्यांच्या भावकवितेतून त्यांच्या अंतर्मुख, विकसनशील व समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचा कलात्मक आविष्कार आढळतो. भारतीय संस्कृतीचे भक्कम अधिष्ठान त्यांच्या कवितेस आहे.प्रतिभासंपन्न कन्नड नवकवींत त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी कन्नड काव्यात काही प्रवाह आणले व विविध प्रयोगही केले. त्यांच्या भावकवितेतून त्यांच्या अंतर्मुख, विकसनशील व समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचा कलात्मक आविष्कार आढळतो. भारतीय संस्कृतीचे भक्कम अधिष्ठान त्यांच्या कवितेस आहे.

प्रतिभासंपन्न कन्नड नवकवींत त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी कन्नड काव्यात काही प्रवाह आणले व विविध प्रयोगही केले. त्यांच्या भावकवितेतून त्यांच्या अंतर्मुख, विकसनशील व समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचा कलात्मक आविष्कार आढळतो. भारतीय संस्कृतीचे भक्कम अधिष्ठान त्यांच्या कवितेस आहे.काव्यलेखन ‘विनायक’ ह्या नावाने केले.
. मुंबई आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांचे ते एम्.ए. (इंग्रजी) आहेत. इंग्रजीचे नाणावलेले प्राध्यापक व शिक्षणतज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती आहे. इंग्रजीतील त्यांची ग्रंथनिर्मितीही विपुल आहे. पुणे, सांगली, हैदराबाद, वीसनगर, कोल्हापूर, धारवाड येथे ते इंग्रजीचे प्राध्यापक वा प्राचार्य म्हणून होते.

त्यांनी अनेक मानाच्या व जबाबदारीच्या जागी काम केले. हैदराबाद येथील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश’ चे संचालक (१९५९—६६), बंगलोर विद्यापीठाचे उपकुलगुरू (१९६६—६९), सिमल्याच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्सड स्टडी’चे संचालक (१९७०-७१), ‘ऑल इंडिया सत्य साई एज्युकेशनल ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष, ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश’चे सभासद, भारतीय ज्ञानपीठाचे सभासद इ. मानाची पदे त्यांनी भूषविली.
कन्नड साहित्य संमेलनाचे (बेल्लारी, १९५८) अध्यक्ष, ‘ऑल इंडिया इंग्लिश टीचर्स कॉन्फरन्स’चे अध्यक्ष (१९६०), ‘कॉमनवेल्थ कॉन्फरन्स ऑन टीचिंग ऑफ इंग्लिश’चे उपाध्यक्ष (युगांडा, १९६०), ‘पेन’ च्या (पी.ई.एन्.) टोकिओ येथील जागतिक मेळाव्यास भारताचे प्रतिनिधी (१९५६), बेल्जियम येथील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनास भारताचे प्रतिनिधी (१९६०), ‘केंब्रिज कॉन्फरन्स ऑन टीचिंग ऑफ इंग्लिश लिटरेचर’ला भारताचे प्रतिनिधी (१९६६) इ. बहुमानही त्यांना लाभले.
त्यांच्या द्यावापृथिवी ह्या कन्नड काव्यसंग्रहास साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले (१९६०). १९६० मध्येच भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. कर्नाटक विद्यापीठ (१९६७) तसेच पॅसिफिक विद्यापीठाने (कॅलिफोर्निया, १९६९) त्यांना सन्मान्य डी.लिट्. देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.

• १९९२: ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ ‘पद्मश्री’ डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १९०९)

  • घटना :
    १९१६: होम रुल लीगची स्थापना झाली.
    १९२०: अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.
    १९६९: चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
    २००१: डेनिस टिटो हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ प्रवासी झाला.

• मृत्यू :

  • जन्म :
    १८५४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी वासुकाका जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी, १९४४)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »